CoronaVirus: आता व्होडका तयार करणार २४ टन सॅनिटायझर!

Mumbai
Coronavirus: Vodka company to make 24 tons of hand sanitisers
CoronaVirus: आता व्होडका तयार करणार २४ टन सॅनिटायझर!

करोना वाढता प्रादुर्भाव पाहता हँड सॅनिटायझर ही सर्वांत अत्यावश्यक वस्तू आहे. सध्या हँड सॅनिटायझरची जगभरात प्रचंड मागणी होत आहे. अनेक देशामध्ये सॅनिटायझरचा तुटवडा भासत आहे. काही लोक घरी स्वतः सॅनिटायझर तयार करून वापरत आहेत. दरम्यान आता व्होडका ब्रँडने येत्या आठवड्यात २४ टन इतक हँड सॅनिटायझर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात कंपनीने रविवारी घोषणा केली. ‘अद्याप आम्ही टेस्टिंग करत आहोत. पुरवठा आणि पॅकेजिंगसाठी आवश्यक घटक खरेदी करीत आहोत. तसंच उत्पादनाची तयार करत आहोत. आवश्यक वस्तू पोचविण्याची प्रतीक्षा करीत आहोत. पुढील आठवड्यांमध्ये २४ टन सॅनिटायझर तयार करण्याकरिता उपकरणे आणि आवश्यकतेनुसार तयार करण्याची योजना आहे, असं कंपनीने सांगितलं.

तसंच ज्यांना खूप गरज आहे त्यांना सॅनिटायझर मोफत देणार असल्याची कंपनीने घोषणा केली. कंपनी म्हणाली की, अजून आमच्याकडे सर्व तपशील नाही आहे. पण आम्ही समाजातील लोकांना आणि ज्यांना जास्त गरज आहे त्यांना विनामूल्य देणार आहे.

कंपनीने जे लोक व्होडका सॅनिटायझर म्हणून वापरत आहेत. त्यांना न वापरण्याचा सल्ला दिला आहे.

आतापर्यंत जगभरात ३ लाख ७९ हजार ३७५ करोनाग्रस्तांचा आकडा झाला आहे. यापैकी १६ हजार ५०९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच १ लाख ४८४ जण करोना मुक्त झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: जगभरात आतापर्यंत करोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण रिकव्हर!