बाजारात येऊ शकते कोरोनाची फेक लस, तज्ज्ञांचा इशारा

बाजारात येऊ शकते कोरोनाची फेक लस, तज्ज्ञांचा इशारा

कोरोनाच्या बनावट लसी बाजारात विकल्या जाऊ शकतात. कोरोनाच्या लसीची विक्री जाहीर होताच गुन्हेगार बनावट लस बाजारात आणू शकतात. ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजेंसीच्या अधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

independent.co.ukच्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या लसीची बनावट विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोरोना काळाच्या सुरुवातील गुन्हगारांनी बनवाट पीपीई कीट वैगेर विकण्यास प्रयत्न केला होता.

ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजेंसीच्या इकोनॉमिक क्राईम सेंटर डायरेक्टर जनरल ग्रेएम बिगर यांनी सांगितले की, लसीबाबत फसवणुकीचा मोठा धोका आहे. लस तयार होताच लोकांना बनावट लस देण्याची गँग सक्रीय होतील. हे सर्व रोखण्यासाठी आम्ही पहिल्यांपासून तयारी करत आहोत.

प्रमुख ब्रिटन अधिकारी म्हणाले की, सध्या कोरोवा व्हायरसशी संबंधित अनेक गुन्हेगारी गटना घडत आहेत. बनावट कोरोना टेस्ट विक्री करण्याचा देकील प्रयत्न केला जात होता. यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लस निर्माण करणाऱ्या संस्थेवर हॅकर्सनी अटॅक केले आहेत. लसीसंदर्भात माहिती चोरी करण्याच्या उद्देशाने हॅकर्संनी हल्ले केले होते.

फाइजर, ऑक्सफोर्ड आणि नोवावॅक्ससह अनेक कंपन्यांची लस अंतिम टप्प्यात आहेत. काही महिन्यांतच लस बाजारात येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. फाइजर कंपनीने नुकताच दावा केला आहे की, ९० टक्के लोकांमध्ये ही लस प्रभावी असल्याचे दिसून आले.


हेही वाचा –  धक्कादायक! Corona मुळे फुफ्फुसांमध्ये होतायत रक्ताच्या गाठी; नवं संशोधन