घरदेश-विदेशVIDEO : सुपरस्टारच्या होर्डिंगला दूधाचा अभिषेक करताना दुर्घटना

VIDEO : सुपरस्टारच्या होर्डिंगला दूधाचा अभिषेक करताना दुर्घटना

Subscribe

अजित यांचे काही चाहते होर्डिंगवर चढून दूधाचा अभिषेक करत होते. त्या दरम्यान होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत अजित यांचे ५ चाहते जखमी झाले आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार अजित यांचा नुकताच चित्रपट रिलीज झाला. यासाठी त्यांचे भले मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगला त्यांच्या काही चाहत्यांनी दूधाचा अभिषेक केला. अजित यांचे काही चाहते होर्डिंगवर चढून दूधाचा अभिषेक करत होते. त्या दरम्यान होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत अजित यांचे ५ चाहते जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तामिळनाडूच्या तिरुकोविलुर भागामध्ये घडली आहे. या भागामध्ये अभिनेता अजित यांचा भला मोठा पोस्टर लावण्यात आला होता. या पोस्टरला दूधाचा अभिषेक करण्यासाठी मोठ्या संख्यने त्यांचे चाहते आले. या दूध अभिषेकच्या प्रक्रियेला ‘पाल अभिषेकम’ असे म्हटले जाते.

- Advertisement -

पाहता पाहता दूधाचा अभिषेक करण्यासाठी अजित यांचे चाहते एका पाठोपाठ एक होर्डिंगवर चढले. दुधाचा अभिषेक करत असताना अचानक होर्डिंग खाली कोसळले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अजित यांचे फॅन होर्डिंगवर चढत आहे. उर्फूर्तेने चाहते दुधाचा अभिषेक करण्यासाठी होर्डिंगवर चढत असातनाच अचानक होर्डिंग कोसळले. होर्डिंग कोसळेल असं वाटलं सुध्दा नव्हते. मात्र या दुर्घटनेमध्ये ५ जण जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -