घरदेश-विदेशमेकुनू वादळाचा ओमानला तडाखा, स्थानिकांबरोबर भारतीयांनाही फटका

मेकुनू वादळाचा ओमानला तडाखा, स्थानिकांबरोबर भारतीयांनाही फटका

Subscribe

मेकुनू वादळ हे अरबी समुद्रातून आता ओमानच्या दिशेने वळले आहे. ओमानच्या स्थानिक वृत्तपत्र टाईम्स ऑफ ओमानद्वारे दिलेल्या माहितीनुसार ओमानच्या उत्तर-पश्चिमी भागातील ढोपर क्षेत्रात या वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळीवारे आणि मुसळधार पावसाचे पाणी शहरात घुसले असून जमीन धसत असल्याचे चित्र आहे.

वादळाचा वेग वाढत असल्यामुळे ओमान सरकारने काळजी घेण्याचा इशारा दिला. या वादळात अनेक नागरिक बेपत्ता झाले असून पाच नागरीकांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. हरवलेल्यांना मृत समजले जाणार असल्याचे तेथील गव्हर्नरद्वारे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

वादळाचा परिणाम
मेकुनू वादळामुळे राहत्या ठिकाणी पाणी साचले असून अनेक झाडे पडली आहेत. जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक सेवेला मोठा फटका बसला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवास करण्यासाठी हाड्रोप्लेनचा वापर केला जात आहे. आतापर्यंत ४० नागरिक बेपत्ता झाले असून यामध्ये स्थानिकांबरोबरच भारतीय आणि सूडानी नागरिकही सामील आहेत. पुरामुळे जनावरे वाहून गेली असून वीजेचा पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

युएई वादळापासून बचावले
हे वादळ ओमानच्या उत्तर पश्चिमी भागात धडकल्याने ओमानच्या वायव्येला असलेले संयुक्त अरब एमेरेट्स (युएई) हे वादळापासून बचावले जाणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. शनिवारी हे वादळ सालालाह शहराला धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यावादळामुळे तेथे रहाणाऱ्या २ लाख लोकांना खबरदारी बाळगण्याचा इशारा देण्यात आला. मात्र हे वादळ दुसऱ्या दिशेला वळल्यामुळे या नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे.

भारतीय मान्सूनवर होणार का परिणाम?
मेकुनू वादळाची निर्मिती अरबी समुद्रातच झाली असली तरीही ते अरबी द्वीपकल्पाकडे वळत आहे. त्यामुळे या वादळाचा भारतीय किनारपट्टीला कोणताही धोका नसल्याचे हवामान खात्याने सांगितले. केरमध्ये मान्सून साधारणतः १ जूनला केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचेल अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. २० मे रोजी मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर पोहचेल्याने हा मेकुनूचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -