मृत महिलेच्या गर्भाशय दानातून जन्मले पहिले बाळ

ब्राझीलमध्ये या बाळाचा जन्म झाला असून दोन वर्षांपूर्वी या महिलेला गर्भाशय प्रत्यारोपणातून गर्भाशय मिळाले होते. गर्भाशयात बाळ राहण्यासाठी औषधोपचार केल्यानंतर ही ३२ वर्षीय महिला गरोदर राहिली

Paris
pragnancy
फोटो प्रातिनिधीक आहे.

अवयवदानातून मिळालेल्या अवयवांमुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेले आहे. दोन वर्षांपूर्वी एका मृत महिलेचे गर्भाशयदान करण्यात आले आणि त्या गर्भाशय प्रत्यारोपणातून बाळाचा जन्म झाला आहे. जगात पहिल्यांदाच अशा पद्धतीने मृत महिलेच्या गर्भाशय प्रत्यारोपणातून मुलीचा जन्म झाला आहे. राऊटर्सने दिलेल्या माहितीनुसार हे बाळ आणि आई दोन्ही सुखरुप असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

गर्भाशय प्रत्यारोपणातून जन्मलेली गोंडस मुलगी (सौजन्य- abc news)

कुठे जन्मलं बाळ?

ब्राझीलमध्ये या बाळाचा जन्म झाला असून दोन वर्षांपूर्वी या महिलेला गर्भाशय प्रत्यारोपणातून गर्भाशय मिळाले होते. गर्भाशयात बाळ राहण्यासाठी औषधोपचार केल्यानंतर ही ३२ वर्षीय महिला गरोदर राहिली आणि तिने ब्राझीलमधील साओ पाऊलोमध्ये या महिलेला जन्म दिला आहे. तीन दिवसांपूर्वी या बाळाचा जन्म झाला असून या बाळाचे वजन २.५ किलो इतके आहे. आता आई आणि बाळ सुखरु असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तिला गर्भाशयच नव्हते

ज्या महिलेवर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले. ती महिला गर्भाशयाशिवायच जन्माला आली होती. त्यामुळे अनेक गोष्टींचा विचार डॉक्टर करत होते. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला तब्बल १० तासांचा कालावधी लागला. त्यानंतर ही महिला गरोदर राहिली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळ वाढत होते. पण बाळ जन्माला येईपर्यंत सगळ्याच गोष्टींची धाकधूक होती. जन्माला आलेले बाळ सुखरुप असल्यामुळे पुढील काळात अशा शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडतील, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

या आधीही यशस्वी प्रत्यारोपण

गर्भाशय प्रत्यारोपण या आधीही करण्यात आले आहे. २०१३ साली स्विडनमध्ये पहिले गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले. पण गर्भाशयदान हे जिवंतपणी करण्यात आले आहे. अशा आतापर्यंत ३९ प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया पार पजल्या असून यातून ११ बाळांचा आतापर्यंत जन्म झाला आहे. पण पहिल्यांदाच मृत महिलेच्या गर्भाशय प्रत्यारोपणातून बाळ जन्माला आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here