घरदेश-विदेशउन्नाव बलात्कारप्रकरणी आज निकाल

उन्नाव बलात्कारप्रकरणी आज निकाल

Subscribe

उन्नाव बलात्कारप्रकरणी आज लागणार निकाल

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उन्नाव बलात्कारप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून आज निकाल दिला जाणार आहे. उन्नाव येथे २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपने आमदार कुलदीपसिंग सेंगर याच्यावर या बलात्काराचा आणि अपहरणाचा आरोप करण्यात आला असून भाजपाने त्याची याप्रकरणावरुन पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे.

काय उन्नाव बलात्कार प्रकरण?

भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरने काही साथीदाऱ्यांसह पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या पीडितेने आपल्याला न्याय मिळावा यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला होता. त्यानंतर भाजपने या आमदाराची पक्षातून देखील हकालपट्टी केली. तेव्हापासून कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरु होती.

- Advertisement -

हेही वाचा – नागरिकत्व सुधारणा कायदा सावरकरांच्या तत्वांविरोधात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -