तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या मुजोर मुलाला अटक

व्हिडिओ नीट ऐकला असता ही तरुणी या तरुणाची प्रेयसी असल्याचे कळले. तर हा मारणारा तरुण पोलिसाचा मुलगा असल्याचा सांगितले जात होते.

New delhi
delhi_boy
तरुणीला बेदम मारहाण करताना तरुण

देशाची राजधानी दिल्ली पून्हा एका क्रूर घटनेने हादरली. सोशल मीडियावरील एक व्हिडिओमुळे देशात कायदाव्यवस्था आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला. एका व्हिडिओमध्ये एक तरुण एका मुलीला जबर मारहाण करत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. या व्हिडिओतील हा मुलगा पोलिसाचा असून त्याचा तातडीने शोध घेत अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सोशल मीडियावर तरुणीला मारहाण करणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला. एक तरुण तरुणीला एका कार्यालयात मारत होता. व्हिडिओ नीट ऐकला असता ही तरुणी या तरुणाची प्रेयसी असल्याचे कळले. तर हा मारणारा तरुण पोलिसाचा मुलगा असल्याचा सांगितले जात होते. हा व्हिडिओ आल्यानंतर पोलिसांना या संदर्भात विचारणा केली असता या संदर्भात कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पण गृहमंत्र्याच्या आदेशानंतर पोलिसांनी शोध सुरु केला.

तरुणानेच करायला लावला व्हिडिओ

पोलिसांच्या तपासात या तरुणाचे नाव रोहित असल्याचे समजत आहे. तो नवी दिल्लीतील राम नगरचा रहिवासी असून त्याने हा व्हिडिओ शूट करायला लावला. या तरुणाचे वडील पोलिस असून या मुलाने हा व्हिडिओ अन्य मुलींना पाठवला आणि मला नकार द्याल तर असे परिणाम होतील, असे सांगितले. दरम्यान या मुलीने टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. या मुलीच्या तक्रारीनुसार त्या दोघांचे दोन वर्ष प्रेमसंबंध होते. पण या तरुणाचे दारु पिऊन मारणे आणि स्वभावामुळे तिने हे संबंध संपवले.

गृहमंत्र्यांनी केले ट्विट

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी एका मुलीला एक तरुण जबर मारहाण करत होता. दिल्ली पोलिस कमिश्नरशी या संदर्भात बोलणे झाले असून या संबंधी पोलिसांना योग्य ती कारवाई करायला सांगितले आहे.