दिल्ली दंगल प्रकरण : JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला UAPA कायद्याअंतर्गत अटक

Delhi riots case Former JNU student leader Umar Khalid arrested under UAPA Act
मर खालिदला रविवारी रात्री अटक करण्यात आली.

दिल्ली दंगल प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला रविवारी रात्री अटक केली. ही अटक बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (UAPA) करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ११ तासांच्या चौकशीनंतर खालिदला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

दिल्ली दंगलीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ सप्टेंबर रोजी उमरची चौकशी केली होती. यापूर्वी दंगलीसंबंधित आणखी एका प्रकरणात पोलिसांनी उमर खालिदविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दंगलीचा कथित कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने उमरची चौकशी केली. त्याचा मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला होता.

उमर खालिदच्या अटकेनंतर युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुपने एक निवेदन जारी केलं आहे. युनायटेड अटेन्स्ट हेटने म्हटले आहे की, “११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली हिंसाचार प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप ठेवत अटक केली आहे. अटक सत्र सुरु राहिलं तरी देखील CAA आणि NRC विरोधातील लढा हा सुरुच राहणार आहे. त्याला जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करणं हे आमचं प्राधान्य आहे आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.”