घरदेश-विदेशसावधान! तुमच्या व्हॉट्सअॅपवर Momo येते आहे

सावधान! तुमच्या व्हॉट्सअॅपवर Momo येते आहे

Subscribe

साधारण २-३ वर्षांपूर्वी आलेला ब्लू व्हेल गेम तुम्हाला आठवतच असले. जगभरातल्या अनेक मुलांनी त्या थरारक ब्लू व्हेल गेममुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषत: तरुण वर्गाला टार्गेट करुन त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या त्या गेमवर जगभरातून बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अशाचप्रकारचा एक भयानक गेम सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या गेमचं नाव आहे ‘मोमो’.  ‘मोमो व्हॉटस् अ‍ॅप चॅलेंज’ असं एक चॅलेंज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या धक्कायदायक माहितीनुसार हे ‘मोमो’ व्हॉटस् अ‍ॅप चॅलेंज तरुणांना आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे. अनेक देशांमध्ये हा मोमो चॅलेंज वेगाने पसरत आहे. याआधी फेसबुकवर हा ‘मोमो’ गेम व्हायरल झाला होती.

Momo game
सौजन्य- metro.co.uk

सुरुवातीला तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एक नंबर येतो. हा नंबर ‘मोमो’ या नावाने सेव्ह केलेला असतो आणि त्यावर एका विचित्र चेहऱ्याच्या बाईचा फोटो असतो. इतकंच नाही तर त्याखाली ‘कॉन्टॅक्ट मी’ असा मेसेजही लिहीलेला असतो. अनेक लोक उत्सुकतेपोटी हा नंबर सेव्ह करतात आणि तिथूनच या खेळाला सुरुवात होते. आतापर्यंत समोर आलेल्या अहवालानुसार बऱ्याच लोकांनी या मोमोचा नंबर सेव्ह करुन तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञ सांगतात की, या नंबरवरुन तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क साधता, ती व्यक्ती सुरुवातीला तुमच्या मनामध्ये भीती भरवते. आयुष्यातील अडचणी, संकटं यांची भीती दाखवत कॉल करणाऱ्याला घाबरवून टाकते, निराश करते. त्यानंतर एकप्रकारे हिप्नोटाईज करुन कॉलरला आत्महत्येकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. रिपोर्टनुसार सध्या अमेरिकेमध्ये हा भयानक मोमो चॅलेंज वेगाने पसरत असून, हा विकृत गेम मेक्सिको आणि ब्राझीलमधील काही लोक पसरवत आहेत. ‘मोमो’मध्ये दिसणारी ती विचित्र चेहऱ्याची बाई, जपानच्या एका वस्तू संग्रहालयातील बाहुलीसारखी दिसते. प्रसिद्ध जपानी कलाकार मिदोरी हयाशी यांनी  ती चित्रविचीत्र बाहुली बनवली होती.

- Advertisement -
momo game
(सौजन्य-सोशल मीडिया)

दरम्यान तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अमेरिकेव्यतिरिक्त अन्य देशांमध्येही हा ‘मोमो’ कॉन्टॅक्ट पसरण्याची शक्यता आहे. यावर रोख लावण्याचा प्रयत्न सुरु असला, तरी लोकांनी स्वत:सुद्धा सावधानी बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे. ‘तुमच्या व्हॉट्सअॅपवर जर हा मोमो नंबर आला तर तो सेव्ह न करता, ताबडतोब डिलीट करुन टाका’, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान ‘मोमो’च्या निमित्ताने पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीच्या गैरवापराचं एक भयानक उदाहरण समोर आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -