घरदेश-विदेशइंग्रजी भाषा हा देशाला जडलेला आजार - उपराष्ट्रपती

इंग्रजी भाषा हा देशाला जडलेला आजार – उपराष्ट्रपती

Subscribe

देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी इंग्रजी भाषेला रोग म्हटले आहे. देशाला जडलेला हा इंग्रजी भाषेचा आजार ब्रिटिश साम्राज्य भारत सोडून जाताना मागे ठेऊन गेले असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी इंग्रजी भाषेला रोग म्हटले आहे. देशाला जडलेला हा इंग्रजी भाषेचा आजार ब्रिटिश साम्राज्य भारत सोडून जाताना मागे ठेऊन गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदी ही भारतातील “सामाजिक-राजकीय आणि भाषिक ऐक्य” चे प्रतीक असल्याचे नायडू यांनी यावेळी म्हटले आहे. ‘ये बिमारी जो अंग्रेजीवाला छोडकर गया, इस बिमारी से हमें मुक्त करना चाहिए’, असे वक्तव्य उपराष्ट्रपतींनी एका कार्यक्रमादरम्यान केले. १४ सप्टेंबर रोजी असलेल्या हिंदी दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या विज्ञान भवनात हिंदी दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी हे मतं व्यक्त केले.

भाषा आणि भावना या समांतर रेषेत असतात. जर तुम्हाला सर्वसामान्यांना समजून घ्यायचे असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त कराव्या लागतील. आपल्या मातृभाषेत भावना व्यक्त करणे अधिक सोपे असते. हा सर्वांचाच अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये मातृभाषेत बोलणे आवश्यक आहे.
– वैंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

- Advertisement -

मातृभाषेचा सन्मान करा 

संविधानसभेत (संविधानाने तयार केलेल्या) १४ सप्टेंबर १९४९ साली हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषांपैकी एक म्हणून मान्यता दिली होती. आम्ही संविधान विधानसभेची इच्छा पूर्ण करण्यास सक्षम झालो आहोत का, असा प्रश्न नायडू यांनी यावेळी उपस्थित केला. तर याच बैठकीत इंग्रजी भाषेला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले होते, असेही त्यांनी म्हटले. नायडू हे प्रामुख्याने विविध राज्यांमधील भाषणांची सुरूवात ही त्या त्या स्थानिक भाषेतून करतात, त्यानंतर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत त्यांचे भाषण होते. आपण आपल्या मातृभाषेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, हे नायडू यांनी या कार्यक्रमात नमूद केले.

हिंदी ही स्वातंत्र्यसेनानींची मुख्य भाषा होती

उपराष्ट्रपतींनी यावेळी प्रादेशिक भाषेतील साहित्य भाषेच्या भाषांतरात हिंदीत अनुवाद करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, हिंदी ही स्वातंत्र्यसेनानींची मुख्य भाषा होती आणि बहुतेक भाषांमधून ती बोलली तसेच समजली जात होती. “हे देशातील सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि भाषिक ऐक्याचे प्रतीक होते. आजही, हे गुण इतर सर्व भाषांमध्ये स्वीकराले जातात, “असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -