घरदेश-विदेशपाकिस्तान विरोधात लढण्यासाठी तज्ञानी सुचवला 'हा' पर्याय

पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी तज्ञानी सुचवला ‘हा’ पर्याय

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सैन्य आणि इंटेलिजेंट एजेंट यांनी पाकिस्तान विरोधात अनेक पर्याय प्रस्तावित केले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत आहे.

गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या फुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जवानावंर झालेल्या हल्ल्या निषेध ठिकठिकाणी होत आहे. या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहिद झाले आहेत. या हल्ल्यानंतर सरकारवर दबाव आला आहे. याहल्ल्याच्या विरोधात तज्ञांनी पर्याय सुचवले आहेत. कॅबिनेट सचिवालयचे माजी विशेष सचिव आणि पाकिस्तानवरील दोन पुस्तकांचे लेखक टिळक देवेशर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये या पर्यायांबद्दल माहिती दिली आहे.

काय म्हणाले टिळक देवेशर

“भारताने सर्जीकल स्ट्राईक करूनही त्याचा काही फायदा झाला नसल्याचे चित्र कालच्या हल्ल्याने समोर आले. पाकिस्तानला नमवण्यासाठी आपल्या जवळ असलेल्या सर्वपद्धतींचा वापर केला गेलेला नाही. आपल्या जवळ डिप्लोमॅटीक पर्याय देखील आहेत. पाकिस्तानातील उच्चायुक्तांना परत बोलावणे किंवा पाकिस्तानसोबतचे राजकीय संबध कमी करणे यामुळे पाकिस्तानला चांगला धडा भेटेल. जर अशा प्रकारचे वातावरण बनवले तर पाकिस्तानावर भारताला दबाव आणता येईल. सैन्यात असताना विरोधकांवर हल्ला करण्याचे स्वातंत्र खुद्द पंतप्रधानांनी वायू सेनेला दिले होते. पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये काश्मीर येथे राहणाऱ्या नागरिकांचाही समावेश आहे. नागरिकांच्या मदतीमुळे अशा प्रकारचे हल्ले होऊ शकत नाही त्यामुळे सैनिकांनीही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.” – टिळक देवेशर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -