दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष मांगेराम गर्ग यांचे निधन

New Delhi
Mange Ram Garg
माजी प्रदेशाध्यक्ष मांगेराम गर्ग (सौजन्य-खास खबर)

दिल्लीच्या तिनदा मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाल्यानंतर दिल्लीतील आणखी एका मोठ्याची बातमी रविवारी सकाळी आली. दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष मांगेराम गर्ग यांचे आज, २१ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे दिल्लीतील अॅक्शन बालाजी हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. तिथेच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.