दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे.

Mumbai
Former Delhi CM and senior Congress leader Sheila Dikshit passes away at 81
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना आज सकाळी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शीला दीक्षित यांनी गेली १५ वर्षे मुख्यमंत्री पद भूषवले असून त्या दिल्ली कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या. एकीकडे देशभरात काँग्रेसची वाताहत होत असताना शीला दीक्षित सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे दिल्ली कॉंग्रेसमधील मोठ नेतृत्व हरपले आहे.

शीला दीक्षित यांच्याविषयी थोडक्यात

शीला दीक्षित यांनी गेली १५ वर्षे मुख्यमंत्री पद भूषवले असून त्यांनी सर्वाधिक काळ काम पाहिले होते. तसेच त्यांनी केरळच्या राज्यपाल म्हणून देखील काम पाहिले होते. त्याचप्रमाणे त्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होत्या. तर सध्या दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच दीक्षित या कुशल संघटकही होत्या. तर २००८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अभूतपूर्व विजय मिळवला होता. तसेच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ७० पैकी ४३ जागांवर दणदणीत विजय मिळविला होता.