घरदेश-विदेशगुप्तहेरासह चार दहशतवादी शिरले भारताच्या हद्दीत; भारतात हाय अलर्ट

गुप्तहेरासह चार दहशतवादी शिरले भारताच्या हद्दीत; भारतात हाय अलर्ट

Subscribe

भारतात पाकिस्तानची गुप्तहेर संघटनेचा एक गुप्तहेर आणि चार दहशतवादी शिरले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसचा एक गुप्तहेर आणि त्याच्यासोबत चार दहशतवादी भारताच्या हद्दीत शिरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेभागासह संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. हे दहशतवादी कुठेही घातपात घडवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी संकटनांकडून काही केल्या दहशतवादी कारवाई थांबत नाही आहेत. वारंवार दहशतवादी भारतात घातपात घडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांमुळे बऱ्याचदा हे घातपात रोखण्यात आले आहेत.तरीदेखील पुलवामा आणि उरी सारखे घातपात घडले. या अशाप्रकारचे घातपात घडू नये म्हणून सीमेवर जवान डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करत आहेत. मात्र, तरीही त्यांना चकवा देऊन हे दहशतवादी घुसखोरी करतात. यावेळी चार दहशतवादी आणि एक गुप्चतहेर अफगाणिस्तानचा पासपोर्ट दाखवून भारतात शिरले आहेत. त्यांचा तपास सध्या सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

राजस्थानच्या पोलीस अधिक्षकांनी पाठवले पत्र

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी यासंदर्भात सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये दहशतवादी कोणत्याही क्षणी घातपात घडवू शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यचामुळे सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे सांगण्यात आले आहे. या पत्रात बाजार, हॉटेल्स, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – भारताच्या एकमेव रणरागिणीची ३०० पाकिस्तान्यांशी झुंज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -