बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारात होणार वाढ

good news for bank employees 15 percent increase in salary

देशातील लाखो बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी गोड झाली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. नोव्हेंबरपासून वेतन वाढीचा लाभ मिळणार आहे. भारतीय बँक संघटनेने (आयबीए) म्हटले आहे की कर्मचारी संघटना आणि अधिकारी संघटनांशी ११ चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयबीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता म्हणाले, “इंडियन बँक असोसिएशन (कर्मचारी) संघटना आणि अधिकारी संघटनांच्या सहमतीने ११ व्या द्विपक्षीय वेतनवाढीची माहिती जाहीर करतो.” १ नोव्हेंबर २०१७ पासून हा निर्णय लागू होणार आहे. करारामध्ये पगारात १५ टक्के वाढीची तरतूद आहे. हा करार सार्वजनिक क्षेत्रातील बँका, काही जुन्या पिढीतील खासगी बँका आणि काही विदेशी बँकांना लागू असेल.

 पाच कर्मचारी संघटना आणि बँक अधिकाऱ्यांच्या चार संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे यूएफबीयू आणि आयबीए यांनी तीन वर्षांच्या चर्चेनंतर यंदा २२ जुलै रोजी पगारात १५ टक्के वाढ केली. सुमारे ३७ सरकारी, खासगी आणि आंतरराष्ट्रीय बँकांनी आयबीएला वेतनवाढी संदर्भात चर्चा करण्यास भाग पाडले होते. पगाराच्या या वाढीमुळे बँकांवर वर्षाकाठी ७,८९८ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.