घरदेश-विदेशराम मंदिरासाठी संतांचे राज्यपालांना निवेदन

राम मंदिरासाठी संतांचे राज्यपालांना निवेदन

Subscribe

अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी आता संत देखील सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आज अंजनगाव-सुर्जी येथील श्रीदेवनाथ मठाचे पिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना राम मंदिर बांधण्याचे निवेदन दिले आहे.

अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी आता संत सक्रिय झाले आहेत. त्यानंतर्गत आज अंजनगाव-सुर्जी येथील श्रीदेवनाथ मठाचे पिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन, विदर्भ प्रांताध्यक्ष राजेश्वर निवल आणि प्रांतमंत्री अजय निलदावार देखील उपस्थित होते.

यासंदर्भात माहिती देताना विहीपचे प्रातंमंत्री निलदावार यांनी सांगितले की, अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी आता हिंदुंच्या धैर्याचा बांध जवळपास तुटण्याच्या वाटेवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून थंड्या बस्त्यात असलेले हे प्रकरण आता हातावेगळे व्हावे यासाठी समाजातील प्रत्येक घटकातून ओरड होत आहे. तर जनभावना लक्षात घेता अयोध्येत सर्वसंमतीने राम मंदिर उभारणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे या भावना राज्यपालांना कळवण्याच्या हेतून देवनाथ मठाधिश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. याप्रसंगी जितेंद्रनाथ महाराजांनी राज्यपालांना सांगितले की, राम मंदिराची निर्मिती हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न असून हा विषय कोट्यवधी हिंदुंच्या आस्थेशी निगडीत आहे. त्यामुळे याप्रकरणी झटपट तोडगा काढून मंदिराची निर्मीती करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

वाचा – तरच आमचा राम मंदिराला पाठिंबा – प्रकाश अांबेडकर

वाचा – राम मंदिरासाठी आरएसएसची ९ डिसेंबरला मेगा रॅली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -