गोव्यात लग्नापूर्वी एचआयव्ही टेस्ट बंधनकारक

गोव्यात लग्नापूर्वी एचआयव्ही टेस्ट करणे बंधनकारक करणारा नियम लागू करण्यात येणार आहे.

Panaji
HIV aids
एचआयव्ही

यव्ही हा सर्वात जास्त लैंगिक संक्रमणातून होणारा आजार आहे. त्यातून झालेल्या गर्भधारणेतून हा आजार बाळालाही होऊ शकतो. त्यामुळे, मातेपासून बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये आणि हे प्रमाण कमी करता यावे यासाठी गर्भवती मातेच्या गर्भधारणेनंतर चाचण्या केल्या जातात. मात्र, आता लग्नापूर्वी देखील एचआयव्ही टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम गोव्यात लागू करण्यात येणार आहे. आता गोव्यात रजिस्टर्ड लग्न करायचे असेल तर दांपत्याने एचआयव्ही टेस्ट करुन घेणे बंधनकारक होणार आहे, असा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.

२००६ साली ही असा कायदा आला होता

लग्नापूर्वी एचआयव्ही टेस्ट बंधनकारक करण्याचा नियम गोव्यात आता लागू करण्यात येणार असून तशा स्वरुपाचा कायदा विधानसबेत सादर करणार असल्याचे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी पणजीत सांगितले. गोव्याच्या कायदा विभागात आम्ही हा प्रस्ताव पाठवलेला आहे. एकदा का तिथे पा प्रस्ताव मंजूर झाला की, आम्ही तो विधानसभेत येत्या पावसाळी अधिवेशनात सादर करणार आहोत, असेही यावेळी राणे म्हणाले आहेत. तसेच २००६ साली तेव्हाच्या कॉंग्रेस सरकारनेही अशा प्रकारचा कायद्याचा प्रस्ताव आणला होता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – राज्यात गर्भवतींमध्ये एचआयव्ही होण्याचे प्रमाण घटले

हेही वाचा – मुंबईच्या तुरुंगातील १३३ कैद्यांना ‘एचआयव्ही’ची लागण