Coronavirus: सिंगापूर, तैवान आणि हाँगकाँगमध्ये करोना नियंत्रणात कसा?

या देशांनी ज्यांचे चीनशी संबंध असूनही करोनाग्रस्तांची संख्या कमी ठेवण्यात यश मिळवलं आहे.

Mumbai
badlapur 3 new covid 19 positive cases have been reported today
अंत्यसंस्कारासाठी गेले आणि कोरोनाबाधित झाले

संपूर्ण जगात थैमान घालणारा करोना सिंगापूर, तैवान आणि हाँगकाँगमध्ये नियंत्रणात कसा? हे देश चीनच्या जवळ असून देखील असं काय केलं या देशांनी की, त्यांना हा विषाणू नियंत्रणात ठेवता आला. २००३ साली सार्स (SARS – severe acute respiratory syndrome) या साथीच्या रोगाने ८०००हून अधिक संक्रमित झाले होते तर, ७७४ जणांचा मृत्यू झाला होता. हाँगकाँगमधील २९९ जणांचा मृतांमध्ये समावेश होता. जरी सार्सने बर्‍याच आशियाई महानगरांना उध्वस्त केले, परंतु त्यानंतर काहींनी पुढच्या संकटाची तयारी सुरू केली. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीडरशिप इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ ट्रान्सफॉर्मेशनचे सह-संचालक जेरेमी लिम म्हणतात, सार्सकडे आम्ही एक तालीम म्हणून बघतो. सार्सच्या महामारीनंतर सिंगापूरमध्ये संसर्गजन्य आजारांना तोंड देण्यासाठी उत्तम आरोग्य यंत्रणा निर्माण केल्या. याचाच फायदा त्यांना कोविड-१९शी लढण्यासाठी झाला.

त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे सुरुवातीपासूनच आक्रमक निर्णय घेतले. चीनपासून अवघ्या ८१ मैलांवरील तैवानमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण अपेक्षित होते. वुहानमधून तैवानमध्ये येणाऱ्या २ दशलक्ष लोकांची आधीपासूनच आरोग्य तपासणी केली जात होती. तैवान, हाँगकाँग आणि सिंगापूर यांनी सर्वात आधी बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांवर प्रवास बंदीची सक्रियपणे अंमलबजावणी केली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रवासावर बंदी घालण्याची गरज नव्हती असा आग्रह धरला होता.


हेही वाचा – CoronaEffect : आरबीआयची मोठी घोषणा!

या देशांनी करोनाबाबत सामाजिक जनजागृती जदेखील मोठ्या प्रमाणात केली. शाळा, कॉलेज, ऑफिस, शॉपिंग मॉल सर्व बंद केलं. लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलं. ज्यांना करोनाची सौम्य लक्षणे दिसतील त्यांनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं. ही चाचणी विनामुल्य करण्यात आली.

या देशांनी लॉकडाऊनवर न थांबता ज्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे त्यांना तत्काळ शोधून काढत त्यांना रुग्णालयात दाखल केले. एवढ्यावरच न थांबता ते, जे नागरिक करोनाग्रस्तांच्या संपर्कात आले अशा सर्वांना शोधलं. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलं. या देशांमध्ये करोनाचे नव्याने रुग्ण आढळले नाहीत. मृतांचाही आकडा कमी आहे. अनेक रुग्ण बरे होत आहेत.

अद्याप विजय घोषित करणे चूकिचे ठरेल. परंतु या परिस्थितीविरुद्ध, या देशांनी ज्यांचे चीनशी संबंध असूनही करोनाग्रस्तांची संख्या कमी ठेवण्यात यश मिळविले आहे.