कुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. न्यायालयाच्या वेबसाईटवर आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेबटीव्हीवर या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

Mumbai
Kulbhushan Jadhav
कुलभूषण जाधव

पाकिस्तानच्या कैदेत असलेले निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आज जाहीर सुनावणी होणार आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरी आणि घातपाती कारवाया केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात याप्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. १८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी अशी चार दिवस ही सुनावणी चालणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर या सुनावणीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात येणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे.

अशी होणार आहे सुनावणी

कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणाऱ्या सुनावणीमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पुन्हा समोरा-समोर असणार आहेत. या सुनावणीची सुरुवात भारताच्या बाजूने होणार आहे. त्यानंतर १९ फेब्रुवारी म्हणजे उद्या पाकिस्तान याप्रकरणी आपली बाजू मांडेल. या सुनावणीच्या दुसऱ्या फेरीमध्ये २० फेब्रुवारीला पाकिस्तानकडून मांडलेल्या बाजूवर भारताकडून उत्तर देण्यात येणार आहे. त्यानंतर पाकिस्तानला २१ फेब्रुवारीला भारताने मांडलेल्या बाजूवर पाकिस्तानला उत्तर देण्याची संधी देण्यात येणार आहे.

पाकिस्तानने सुनावलेली फाशीची शिक्षा

कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर विभाग आयईएसआयने कुलभूषण जाधन यांचे अपहरण इराणमधून केले होते. एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. या सुनावणीच्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यानंतर कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली होती. १० न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंतिम निर्णय होईपर्यंत जाधव यांच्या फाशीची अंमलबजावणी न करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. आजच्या सुनावणीमध्ये ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरीश साळवे भारतातर्फे बाजू मांडणार आहेत. न्यायालयाचा निकाल येत्या उन्हाळ्यात अपेक्षित आहे.

सुनावणी लाईव्ह पाहता येणार

आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणारी सुनावणी लाईव्ह पाहता येणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. न्यायालयाच्या वेबसाईटवर आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेबटीव्हीवर या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाईल. पक्षकारांच्या मागणीनुसार इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत न्यायालयाच्या वेबसाइटवरून तसेच संयुक्त राष्ट्रांच्या ऑनलाइन टीव्ही चॅनेलवरून या खटल्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

हेही वाचा – 

पाकचं नवं सरकारही कुलभूषण जाधव यांच्या विरोधातच

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here