अखेर व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्रामची नावं बदलली

यापूर्वी दोन्ही अॅपच्या नावांमध्ये कुठेही फेसबुकचा उल्लेख नव्हता. त्यामुळे अनेकांना हे दोन्ही अॅप फेसबुकच्या मालकीचे असल्याची माहिती अनेकांना नव्हती.

New Delhi
whatsapp instagram facebook
अखेर व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्रामची नावं बदलली

मागील काही दिवसांपासून सर्वाधिक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp आणि फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामचं नामकरण होणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आता या दोन्ही अॅपची नावे बदलण्यास सुरूवात झाली आहे. हे दोन्ही अॅप फेसबुकचे आहेत. त्यामुळे दोन्ही अॅपच्या नावांमध्ये ‘व्हॉट्स अॅप फ्रॉम फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम फ्रॉम फेसबुक’ असा बदल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी दोन्ही अॅपच्या नावांमध्ये कुठेही फेसबुकचा उल्लेख नव्हता. त्यामुळे अनेकांना हे दोन्ही अॅप फेसबुकच्या मालकीचे असल्याची माहिती नव्हती. म्हणूनच कंपनीकडून फेसबुकच्या नावाचा या दोन्ही अॅपसाठी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आठवड्याभरात सर्वांनाच अपडेट उपलब्ध होणार

व्हॉट्स अॅपच्या 2.19.228. या लेटेस्ट बिटा व्हर्जनवर व्हॉट्स अॅपचे सुधारित नाव दिसण्यास सुरूवात झाली आहे. तसेच इन्स्टाग्रामच्यादेखील 106.0.0.24.118. या लेटेस्ट व्हर्जनमध्ये ‘इन्स्टाग्राम फ्रॉम फेसबुक’ हे सुधारित नाव दिसण्यास सुरूवात झाली आहे. एका आठवड्याच्या कालावधीत सामान्य युजर्सपर्यंत या दोन्ही अॅपचे नवे अपडेट उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – सॅमसंग गॅलक्सी नोट १०,नोट १० प्लस आज होणार लाँच

…म्हणून दोन्ही अॅपच्या नावात बदल

हे दोन्ही अॅप फेसबुकच्या मालकीचे आहेत. मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या फेसबुकने २०१२ साली इन्स्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅप्लिकेशन विकत घेतले. त्याचप्रमाणे २०१४ साली फेसबुकने व्हॉट्स अॅपची मालकीही मिळवली. फेसबुकच्या मालकीच्या या दोन्ही अॅप संयुक्तपणे काम करत आहेत. असे असूनदेखील दोन्ही अॅपच्या नावांमध्ये कुठेही फेसबुकचा उल्लेख नव्हता. त्यामुळे हे दोन्ही अॅप फेसबुकच्या मालकीचे असल्याचे अनेकांना माहितीच नव्हते. त्यामुळे कंपनीने दोन्ही अॅपमध्ये फेसबुकचे नाव अंतर्भुत करण्याचा निर्णय घेतला.

फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्राम एकमेकांशी संग्लन होणार?

दरम्यान दोन्ही प्रोडक्ट आणि सेवा हे फेसबुकच्या मालकीचे आहेत हे दाखवण्यासाठी फेसबुकने दोन्ही अॅपच्या नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्राम एकमेकांशी संग्लन करण्याच्या विचारात कंपनी आहे, अशीही चर्चा रंगली आहे.