दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिलाच योग दिवस

Ranchi

पाचव्या जागतिक जागतिक योग दिनासाठी भारतासमवेत संपूर्ण जगात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदी उद्या रांची येथे होणाया ५ व्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान पदाची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतरचा नरेंद मोदींचा हा पहिलाच योग दिन असणार आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास म्हणाले की, रांची येथे होणाऱ्या कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जवळपास ३५ हजार योगप्रेमी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगविद्येस जन आंदोलनाचे रूप द्यायचे होते. उद्या झारखंड सहित संपूर्ण विश्वस्त योगाचे जनआंदोलन पाहायला मिळेल असा विश्वास दास यांनी व्यक्त्त केला.

महाराष्ट्रात ५ व्या जागतिक जागतिक योग दिनाचा मुख्य कार्यक्रम नांदेड येथे आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योग गुरु बाबा रामदेव प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. नांदेड येथे होणाऱ्या योग दिनाचा कार्यक्रमात जवळपास दीड लाख नागरिक एकत्र योगासने करणार असल्याचे समजते.

योग दिनाच्या निमित्त्याने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने योगा लोकेटर नावाचे विशेष अॅप तयार केले आहे. याअॅप द्वारे योग प्रेमींना जगभरातील योगा केंद्र, योग प्रशिक्षक आणि इतर महत्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. या अॅपच्या माध्यमातून २१ जून रोजी जगभरात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे योग दिनासंबंधी स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सर्व कार्यक्रमांबद्दलची माहिती या डिजिटल माध्यमाद्वारे योग प्रेमींना प्राप्त करता येणार आहे.

योग प्रेमींचा उत्साह वाढविण्यासाठी ट्विटर कडून योग दिन विशेष इमोजी सुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. योगा इमोजीसह हॅश टॅग #YogaDay2019 वर जगाच्या कानाकोपऱ्यातून योग विषयक माहिती, छायाचित्र आणि व्हिडियोंनी सामाजिक माध्यम भरून गेले आहेत. ११ डिसेंबर २०१४ साली संयुक्त राष्ट्र संघाच्या १९३ सदस्यांनी तसेच १७७ देशांनी एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योग विषयक प्रस्तावाला मान्यता देत २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून घोषित केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here