निजामुद्दीन मेळाव्याहून परतलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

mumbai

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या मेळाव्याहून गुजरातमध्ये घरी परतलेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या मेळाव्यास देशाबरोबरच अनेकजण परदेशातूनही आले होते. गुजरातमधील एकूण ७२ लोक या मेळाव्यात सहभागी झाले होते. यात ३४ अहमदाबाद, २० भावनगर आणि १२ जम मेहसाणा येथून आले होते. यातील भावनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला होता. त्याचा मृत्यू झाला आहे. तर इतरांना क्वारनटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान या मेळाव्यात सहभागी झालेल्यांचा देशभरात शोध सुरू असून यात महाराष्ट्रातून नागपूर येथून ५४ जण आल्याचे समोर आले्. आहे. तर कर्नाटकमधून ३४२ जण याप्रकारे विविध राज्यातून दोन हजाराहूनही अधिक जण या मेळाव्यात सहभा्गी झाले होते, त्यातील १८०० जणांना क्वारनटाईन करण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.