घरदेश-विदेशअखेर जनार्दन रेड्डी हजर झाले!!

अखेर जनार्दन रेड्डी हजर झाले!!

Subscribe

कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी पोलिसांना शरण आले आहेत. मागील ३ ते ४ दिवसांपासून रेड्डी फरार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या.

कर्नाटकचे माजी मंत्री आणि खाण सम्राट म्हणून ओळख असलेले जनार्दन रेड्डी अखेर पोलिसांना शरण आले आहेत. खाण घोटाळ्यामध्ये जनार्दन रेड्डी यांची सध्या चौकशी करण्यात येत आहे. मागील ३ ते ४ दिवसांपासून रेड्डी पसार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. बैंगरूळू पोलिस सध्या पॉंझी स्किमबाबत देखील चौकशी करत असून त्यासंदर्भात जनार्दन रेड्डी यांची देखील चौकशी सुरू आहे. अहमद फरीद यानं ६०० कोटी रूपयांचा हा पॉंझी स्किम घोटाळा केला असून अंमलबजावणी संचलनालय यासंदर्भात चौकशी करत आहे. चौकशी दरम्यान फरीद यानं जनार्दन रेड्डी यांना १८ कोटी रूपये दिल्याचा दावा केला आहे. यावेळी जनार्दन रेड्डी यांनी केसमध्ये मदत करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती अहमद फरीद यानं पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद फरीदनं १५ हजार लोकांना तब्बल ६०० कोटी रूपयांचं गंडा घातला आहे. अहमद फरीदनं अम्बिंडंट मार्केटींग कंपनी ही बोगस कंपनी स्थापन केली आणि त्याचा माध्यमातून लोकांना गंडवलं. काही गुंतवणूकदारांनी पोलिस तक्रार केल्यानंतर कंपनीवर छापे मारण्यात आले. त्यानंतर ईडीनं कंपनीची काही बँक खाती देखील गोठवली. दरम्यान, अहमद फरीद आणि खाण घोटाळ्यामध्ये देखील एकाच वेळी पोलिस जनार्दन रेड्डी यांची चौकशी करत आहेत. जनार्दन रेड्डी पोलिसांसमोर हजर झाल्यानं या दोन्ही प्रकरणातील सत्यता लवकरच बाहेर येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -