घरदेश-विदेशसाध्वी प्राची बरळल्या म्हणे नेहरू मोठे बलात्कारी

साध्वी प्राची बरळल्या म्हणे नेहरू मोठे बलात्कारी

Subscribe

देशात रोज महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असताना राजकीय नेते मात्र खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करत आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हेच सर्वात मोठे बलात्कारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी आज केले. भारत जगात बलात्काराची राजधानी बनला आहे, या राहुल गांधीच्या वक्तव्याचा समाचार घेत असताना साध्वी प्राची यांनी हे वक्तव्य केले.

साध्वी प्राची म्हणाल्या की, “भारत हा राम आणि कृष्णाचा देश आहे. राहुल गांधींना हे माहिती नाही. खरंतर नेहरू हेच मोठे बलात्कारी होते, त्यांनी राम आणि कृष्णाची संस्कृती बिघडवली. दहशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार आणि बलात्कार ही तर नेहरू घराण्याची देण आहे.” मेरठ येथील एका कार्यक्रमात साध्वी प्राची यांनी भाजप विरोधी पक्षांवर टीका केली. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी हैदराबाद पोलिसांचा आदर्श मानत उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपींनाही कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही साध्वी प्राची यांनी या कार्यक्रमात केली.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात शनिवारी बोलत असताना भारत जगात बलात्काराची राजधानी झाली असल्याची टीका केली होती. तसेच आपण भारतीय आपल्या महिलांची काळजी का घेऊ शकत नाही? असा प्रश्न परदेशी नागरिकांना पडत असावा, असे देखील राहुल गांधी म्हणाले होते. तसेच उत्तर प्रदेशमधील भाजपचा एक आमदार बलात्काराच्या प्रकरणात अडकलेला आहे. मात्र आपले पंतप्रधान त्याबाबत एकही शब्द बोलत नाहीत, अशीही टीका गांधी यांनी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -