घरदेश-विदेश८९ वर्षांचे आजोबा विद्यार्थ्यांसाठी बनले आदर्श!

८९ वर्षांचे आजोबा विद्यार्थ्यांसाठी बनले आदर्श!

Subscribe

कर्नाटकातील ८९ वर्षाचे आजोबा पीएचडीचे शिक्षण घेणार आहे. शिक्षणासाठी वय नसते हे या आजोबांनी सिध्द करुन दाखवले आहे.

शिक्षणाला वय नसते. आपण कोणत्याही वयामध्ये शिक्षण घेऊ शकतो. हे कर्नाटकातल्या एका ८९ वर्षाच्या आजोबांवरुन सिध्द झाले आहे. कर्नाटकातल्या कौप्पाल येथे शरणबसवराज बिसराहली यांनी नव्वदी गाठली तरी त्यांना शिक्षणाची आवड काही संपत नाही. या वयामध्ये ही त्यांना पीएचडी करण्याची इच्छा असून त्यासाठी ते प्रयत्न देखील करत आहे.

आयुष्यात कधी हार मानली नाही

शरणबसवराज बिसराहली हे स्वतंत्रता सेनानी आहेत. त्यांनी आपल्या जीवनात कधी हार मानली नाही. त्यामुळे ते वयाच्या ८९ व्या वर्षी देखील पीएचडी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी पीएचडी पूर्ण करण्यासाठी परिक्षा दिली आहे. त्यांनी कर्नाटक यूनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. यापुढे देखील शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा आहे. पीएचडी करण्याची त्यांची इच्छा असून ते कर्नाटकातील हॅपी यूनिव्हर्सिटीमधून पीएचडी करणार असून त्यांनी प्रवेश परिक्षा देखील दिली आहे.

- Advertisement -

नापास झाले तरी पुन्हा दिली परिक्षा

शरणबसवराज बिसराहली यांनी या आधी लॉचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. पीएचडी प्रवेशासाठी त्यांनी मागच्या वर्षी परिक्षा दिली होती. मात्र त्यामध्ये ते नापास झाले होते. मात्र यामध्ये त्यांनी हार न मानता पुन्हा अभ्यास करुन त्यांनी पुन्हा प्रवेश परिक्षा दिली आहे. यंदाची परिक्षा चांगली गेली असून मी या परिक्षेमध्ये पास होणार असल्याचा विश्वास बिसराहली यांनी व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांसाठी बनले आदर्श

बिसराहली यांना कविता लिहायला आवडतात. साहित्या आणि कन्नड कवितांची एक पुस्तक लिहित असल्याचे त्यांनी सांगतिले. यापुढे पुस्तक लिहण्याची त्यांची इच्छा आहे. या वयात देखील शिक्षणाप्रती असणारे प्रेम आणि इच्छेमुळे बिसराहली हे सर्व जगासमोर आदर्श आणि प्रेरणास्त्रोत बनले आहे. जे विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून देतात, नापास झाल्यामुळे आत्महत्या करतात अशा विद्यार्थ्यांसाठी बिसराहली आदर्श बनले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -