घरदेश-विदेशत्रिशंकूसाठी विरोधक सज्ज; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

त्रिशंकूसाठी विरोधक सज्ज; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

Subscribe

लोकसभा निवडणूकीच्या निकालात त्रिशंकू परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. भाजपाने मंगळवारी एनडीएतील घटक पक्षांना डिनर पार्टी दिल्यानंतर विरोधकांच्या हालचाली वाढल्या आहेत. यंदाची लोकसभा निवडणूकीच्या निकालात त्रिशंकू परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजपा बहुमतापर्यंत न पोहोचल्यास आणि त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपतींना पत्र देण्याची योजना विरोधकांनी आखली आहे. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये यशस्वी झालेली रणनीती पुन्हा एकदा विरोधकांकडून वापरली जाण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षांनी येऊन सरकार स्थापन करणार

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला स्वबळावर सत्ता न मिळाल्यास विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजपा सरकार स्थापण्याचा दृष्टीने विरोधकांची तयारी सुरू आहे. येत्या दोन दिवसात त्याबद्दल राष्ट्रपतींना तसे पत्र देण्याची योजना विरोधकांकडून आखण्यात आली आहे. यासाठी गेल्या आठवडाभरापासून विरोधकांचे बैठकांचे सत्र सुरू आहे. टीपीपीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी विरोधी पक्षातील भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही फोनाफोनी देखील सुरू आहे.

- Advertisement -

यंदा देशात त्रिशंकू लोकसभा होणार आहे. यावर आमचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे एनडीएला बहुमत मिळणार नाही. राष्ट्रवादीने वारंवार सांगितले आहे की, आमची मर्यादित ताकद आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदाचा दावा करणार नाही आणि पवारसाहेब यांनीही वारंवार स्पष्ट केले आहे की या पदाचे ते दावेदार नाहीत परंतु ते पर्यायी सरकार बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.


वाचा – पंतप्रधानांच्या दावणीला निवडणूक आयोग बांधलेला आहे – नवाब मलिक

- Advertisement -

वाचा – निवडणूक आयोगाची आचारसंहिता ही ‘लाचार’ आहे – नवाब मलिक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -