घरताज्या घडामोडीCoronavirus: लहान मुलांना मास्क घालताय? तर सावधान!

Coronavirus: लहान मुलांना मास्क घालताय? तर सावधान!

Subscribe

जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी पालकांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मास्क मुलांसाठी किती धोकादायक असतो हे त्यांनी सांगितले आहे.

जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५७ लाखांहून अधिक झाला असून मृतांचा आकडा ३ लाख ५७ हजारांहून अधिक आहे. या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अजूनही अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. पण काही देशांनी लॉकडाऊन उठवला आहे. तसेच नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंग पालन बंधनकारक केले आहे. पण आता जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुलांना मास्क घालू नका असा सल्ला पालकांना दिला आहे.

संकटाच्या सुरुवातीलाच लहान मुलांना आणि वृद्धांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेक जण आपल्या घरातील लहान मुलांची आणि वृद्धांची अधिक काळजी घेताना दिसत आहे. पालक आपल्या लहान मुलांना बाहेर घेऊन जाताना मास्क घालून नेत आहे. पण हेच मास्क मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असे जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच जपान पीडियाट्रिक असोसिएनने पालकांना सावध केले आहे.

- Advertisement -

यासंदर्भात जपानच्या पीडियाट्रिक असोसिएनने पालकांसाठी सूचना देखील जारी केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालू नका, त्यामुळे त्यांना अनेक समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांचा एअर पॅसेज लहान असतो. त्यामुळे मास्क घातल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच मास्कमुळे लहान मुलांचा हृदयावर ताण येऊ शकतो. शिवाय हिट स्ट्रोकचा देखील धोका वाढू शकतो. यामुळे दोन वर्षांपक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणे बंद करा, असे पालकांना सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Coronavirus: ‘या’ गावात कोरोनाशी लढण्यासाठी छत्री बनवले शस्त्र!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -