घरदेश-विदेशहैद्राबादमध्ये तृतीयपंथीयाला ठेचून मारले, १५ अटकेत

हैद्राबादमध्ये तृतीयपंथीयाला ठेचून मारले, १५ अटकेत

Subscribe

हैद्राबादमध्ये जमावानं तृतीयपंथीयाला ठेचून मारल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. मृत तृतीयपंथी हा अपहरणकर्त्या टोळीचा सदस्य असल्याचा संशय जमावाला आला. त्यानंतर जमावानं तृतीयपंथीयाला ठेचून मारले. हैद्राबादमधल्या चंद्रगुप्त परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

- Advertisement -

हैद्राबादमधल्या चंद्रगुप्त परिसरात तृतीयपंथी अपहरणकर्त्या टोळीच्या सदस्य असल्याचा संशय जमावाला आला. त्यानंतर जमावानं तृतीतयपंथीयाला ठेचून मारले. यावेळी, पोलिसांनी जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, जमावाने पोलिसांवर दगडफेकीला सुरूवात केली.अशी, माहिती एनआयने दिली आहे.मागील १३ दिवसांपासून हैद्राबाद आणि तेलंगणामध्ये अपहरणाच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. त्यातच सोशल मीडियावर देखील यासंबंधीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. याच आधारे जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी तृतीयपंथीयाला ठेचून ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. शिवाय सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल प्रकरणात दोन विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतले आहे.

“अफवा पसरवणाऱ्या व्हिडीओंवर विश्वास ठेवू नका” असे, आवाहन हैद्राबाद पोलिस करत आहेत. शिवाय अफवांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी खबदरीचे उपाय योजिले आहेत. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -