घरदेश-विदेश'माझ्या मुलीचा देशविरोधी कृत्यांमध्ये सहभाग'; शेहला रशीदवर वडिलांचा गंभीर आरोप

‘माझ्या मुलीचा देशविरोधी कृत्यांमध्ये सहभाग’; शेहला रशीदवर वडिलांचा गंभीर आरोप

Subscribe

जेएनयूची माजी विद्यार्थी नेत्या असणाऱ्या शेहला रशीद यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलीचा देशविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप खुद्द तिचे वडील अब्दुल रशीद शोरा यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर शेहलापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही शोरा यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील पत्रच शोरा यांना जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना पाठवले आहे. शेहलासोबत पत्नी जुबैदा, मोठी मुलगी आसमा रशीद आणि पोलीस खात्यामधील एक कर्मचारीही या देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप या पत्रामध्ये शोरा यांनी केला आहे. तसेच जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट पक्षामध्ये सहभागी होण्यापूर्वी शेहलाने एका उद्योजकांकडून तीन कोटी घेतल्याचा दावाही शोरा यांनी केला आहे.

आपल्या जीवाला धोका असून आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी शेहला राशिद हिच्या वडिलांनी केली आहे. अब्दुल रशिद शोरा यांनी पोलीस महासंचालकांना ३ पानी पत्र पाठवले आहे. त्यात आपली मुलगी देशविरोधी आहे. ती देशा विरोधातील अनेक कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये त्यांनी शेहलावर गंभीर आरोप करतानाच आपल्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केली आहे. मागील वर्षीच सप्टेंबर महिन्यात शेहला यांच्याविरोधात लष्कराविषयी एका ट्विट प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लष्कराने नागरिकांचा छळ करून काश्मीर खोऱ्यातील लोकांची घरे लुटल्याचा आरोप शेहला हिने ट्विटरवरुन केला होता. आता थेट शेहला हिच्या वडिलांनीच तिच्यावर गंभीर आरोप केल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

- Advertisement -

शेहला रशीदने फेटाळले आरोप

शेहला रशीदने वडिलांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वडिलांचे आरोप हे आधारहीन आणि घृणास्पद असल्याचे तिने म्हटले आहे. त्याचबरोबर कुठल्याच परिवारात असे होत नाही, जसे माझ्या वडिलांनी केले आहे. त्यांनी माझ्यासह माझी आई आणि बहिणीवरही गंभीर आरोप केले आहेत, असे ट्वीट शेहला रशीद हिने केले आहे. “तुमच्यापैकी अनेकांनी माझ्या वडिलांनी माझ्याबरोबर माझी आणि बहिणीवर केलेल्या आरोपांचा व्हिडीओ पाहिला असेल. अगदी थोड्यात सांगायचे झाल्यास माझे वडील म्हणजे महिलांना मारहाण करणारे, शिव्या देणारे आणि निराश व्यक्ती आहे. आम्ही त्यांच्या या वागण्याविरोधात आवाज उठवला आणि त्यांनी नंतर प्रसिद्धीसाठी हा स्टंट केला आहे,” असे शेहला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -