घरदेश-विदेशनवज्योत सिंग सिद्धूंनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा

नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा

Subscribe

नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धूंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नवज्योत यांनी स्वात: याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवज्योत आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात मतभेद सुरु होते. लोकसभा निवडणुकीत नवज्योत यांच्यामुळे काँग्रेसला कमी जागा मिळाल्याचा आरोप अमरिंदर यांनी केला होता. त्यामुळे दोघांमधील संबंध ताणले गेले होते. दरम्यान, आपण १० जुलैलाच राहुल गांधी यांना राजीनामा पाठवला होता, असे नवज्योत यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी बदलला होता नवज्योत यांचा विभाग 

लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या मंत्र्यांचे विभाग बदलले होते. यामध्ये नवज्योत सिंह सिद्धू यांचा देखील समावेश होतो. मात्र, नवज्योत यांनी पदभार स्वीकारले नाही. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कॅबिनेट मंत्र्याच्या बैठकीत देखील नवज्योत सिंग सिद्धू हजर राहिले नव्हते. दरम्यान, राहुल गांधी यांना त्यांनी राजीनामा १० जुलैला पाठवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्याकडून आपल्याला प्रतिक्रिया न मिळाल्यामुले आपला राजीनामा निश्चित झाल्याचे ते म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -