घरअर्थजगतदोन हजाराच्या नोटांची छपाई होणार बंद ?

दोन हजाराच्या नोटांची छपाई होणार बंद ?

Subscribe

नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे अर्थमंत्रालयाने शनिवारी लोकसभेत सांगितले.

मागील काही महिन्यांपासून दोन हजारच्या नोटांसंदर्भात असणारा संभ्रम निर्माण झाल्याचे दिसतेय. २०१६ साली लागू केलेल्या नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे अर्थमंत्रालयाने शनिवारी लोकसभेत  सांगितले आहे. अर्थमंत्रालयाचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार ठराविक मुल्याच्या नोटा छापण्याचा निर्णय सरकार आरबीआयच्या सल्ल्याने घेतले तर दैनंदिन व्यवहारामध्ये होणाऱ्या मागणीच्या आधारावर यांसंदर्भातील निर्णय घेतले जात असल्याचेही ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन हजारच्या नोटांसंदर्भात असणारा संभ्रम सरकारने दिलेल्या उत्तरमुळे दूर झाला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली नव्हती असंही अर्थमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. “मात्र भविष्यातही दोन हजारच्या नोटांची छपाई थांबवण्यासंदर्भात सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असंही ठाकूर यांनी उत्तरामध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे नोटा छापाईवर परिणाम

एसपीएमसीआयएलने सरकारला दिलेल्या माहितीनुसार करोना लॉकडाऊनमुळे नोटा छापाईवर परिणाम झाला. तर बीएरबीएनएमपीएलमधील नोटांची छपाई २३ मार्च २०२० ते ३ मे २०२० दरम्यान बंद करण्यात आली होती. ४ मे पासून बीएरबीएनएमपीएलमधील नोटांच्या छपाईचे काम पुन्हा सुरु करण्यात आल्याचे देखील सांगितले जातेय.

नोट छपाईचे कारखाने २३ मार्चपासून बंद

लोकसभेत अर्थमंत्रालयाचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी अशी माहिती दिली की, एसपीएमसीआयएलच्या नाशिक आणि दवासमधील नोट छपाईचे कारखाने २३ मार्चपासून लॉकडाउन लागू झाल्यानंतर बंद करण्यात आले. नाशिकमधील करन्सी नोट प्रेस ८ जून २०२० रोजी आणि देवासमधील बँक नोट प्रेस १ जून २०२० रोजी पुन्हा सुरु करण्यात आले आहे. तर नोटांची छपाई बंद होती तरी लॉकाडाऊनच्या कालावधीमध्ये आरबीआयला तसेच अधिकृत संस्थांना दोन्ही ठिकाणांहून गरजेनुसार नोटा पुरवण्यात आल्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


PUBG चं खुळं लय वाईट! ‘ती’ प्रेमात पडली; पार्टनरसाठी सोडलं घरं अन्…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -