घरदेश-विदेशओडिसामध्ये विद्यार्थी करणार 'ट्रॅफिक कंट्रोल'

ओडिसामध्ये विद्यार्थी करणार ‘ट्रॅफिक कंट्रोल’

Subscribe

विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियंत्रणाचे महत्व समजावे यासाठी गेल्यावर्षी, ओडिसाच्या दोन शहरांत 'स्टुडंट ट्रॅफिक व्हॉलेंटिअर' ही योजना राबवण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे आता अन्य ५ शहरात ही योजना राबवण्यात येणार आहे.

ओडिसा राज्यामध्ये गेल्यावर्षी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला होता. राज्यातील कट्टक आणि भुवनेश्वर या दोन शहरांत ‘स्टुडंट ट्रॅफिक व्हॉलेंटिअर’ (एसटीव्ही) हा खास उपक्रम राबवण्यात आला होता. शहरातील ट्रॅफिक पोलिसांनी या उपक्रमांतर्गत काही विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियंत्रणाचे प्रशिक्षण दिले होते. विशेष म्हणजे त्यानंतर वर्षभर जावळपास १०० विद्यार्थ्यांनी आपल्या शहरातील वाहतूक नियंत्रणाच्या कामात पोलीसांनी मदत केली. आजही कट्टक आणि भुवनेश्वरमध्ये यशस्विरित्या हा उपक्रम राबवला जातो. या दोन शहरांध्ये विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे आता ओडिसा पोलीसांनी राज्याच्या अन्य ५ शहरांमध्ये हा उपक्रम राबवण्याचे निश्चीत केले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाने पोलीस खुष

ओडिसाच्या अन्य ५ शहरांमध्येही ‘स्टुडंट ट्रॅफिक व्हॉलेंटिअर’ प्रोग्राम राबवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ओडिसाचे पोलीस महासंचालक- आर.पी.शर्मा यांनी DGP, Odhisha या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे हे जाहीर केले आहे. ‘विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियंत्रणाचे महत्व समजावे यासाठी गेल्यावर्षी राज्याच्या दोन शहरांत ही योजना राबवली गेली. स्थानिक विद्यार्थ्यांकडून या योजनेला खूप चांगला आणि उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही अन्य ५ शहरांतही ही योजना राबवणार आहोत’, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

‘या’ पाच शहरांत राबवणार योजना

  • बरहमपुर
  • बालासोर
  • राउरकेला
  • संबलपुर
  • कोरापुट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -