घरदेश-विदेश'जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं'; पंतप्रधानांचे जनतेला आवाहन

‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’; पंतप्रधानांचे जनतेला आवाहन

Subscribe

कोरोनावर प्रभावी औषध किंवा लस सापडत नाही, तोपर्यंत कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासारखे नियम नागरिकांकडून गांभीर्याने पाळले जात नाहीये. बेजबाबदार नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोनाचे औषध किंवा लस जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मध्य प्रदेशात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

‘दो गज की दूरी, मास्क है जरुरी’

कोरोनावर प्रभावी औषध किंवा लस सापडत नाही, तोपर्यंत कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यासाठी पंतप्रधानांनी एक नाराही दिला. ‘जब तक दवाई नाही, तब तक ढिलाई नही’ असे ते म्हणाले. त्याचबरोबर जनतेने मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. ‘दो गज की दूरी, मास्क है जरुरी’ असा नाराही त्यांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबाबत दिला. नागरिकांनी या संकटाचे गांभीर्य ओळखावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

- Advertisement -

देशात सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक नोंद

देशात सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्ण संख्येने पुन्हा एकदा एका दिवसात सर्व विक्रम मोडले आहे. शनिवारी तब्बल ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाख ५९ हजारांहून अधिक झाली आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत ३६ लाख २४ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

रिकव्हरी रेट वाढून ७७. ७७ टक्क्यांवर

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून ७७. ७७ टक्क्यांवर आला आहे तर मृत्यूचे प्रमाण कमी होऊन ते १.६६ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. यासह २०. ५६ टक्के रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृत्यूचे प्रमाणही जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे.


GoodNews! Covaxin ची माकडांवर चाचणी यशस्वी; भारत बायोटेक कंपनीला यश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -