घरदेश-विदेशमोदींचा २६ मे रोजी सत्ता स्थापनेचा दावा

मोदींचा २६ मे रोजी सत्ता स्थापनेचा दावा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे रोजी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

सतराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सध्या संपूर्ण निकाल लागला जरी नसला तरी देशभरात भाजप पक्ष जास्त जागांवर आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे रोजी सत्ता स्थापनेचा दावा केला. यावर्षी मतदानासाठी ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅटचा देखील वापर केला आहे. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो. अंतिम निकालासाठी शुक्रवारची पहाटही उजाडू शकतो. परंतु, अंतिम निकाल लागण्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंतिम निकाल लागेपर्यंत कोण जिंकले ते समजणार नाही. शिवाय सध्या तरी कोण आघाडीवर आहे, तीच माहिती मिळत आहे. त्यामुळे मोदींनी अतिउत्साहात सत्ता स्थापनेचा दावा केल्याचे जनसामान्यांमध्ये म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -