घरट्रेंडिंगऐकावं ते नवलच! राजस्थानमध्ये पोलीस कबुतरांच्या शोधात

ऐकावं ते नवलच! राजस्थानमध्ये पोलीस कबुतरांच्या शोधात

Subscribe

मोहम्मद सलीम याच्या १४० कबुतरांची चोरी करून चोराने त्याच्या घरातील ५० हजार रूपयांचीही चोरी केली आहे.

कोणाचे काय तर कोणाचे काय, ऐकावे तेवढे नवलचं. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यामध्ये चोरीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. सिकरमध्ये चोरांनी थेट कबुतरं चोरी केली आहेत. कबुतरांसोबतच ५० हजारांची चोरी करून चोर पसार झाले आहेत. फतेहपूर रोडच्या चूरू रेल्वे लाइनजवळ आनंद नगर येथे राहणाऱ्या मोहम्मद सलीम याच्या १४० कबुतरांची चोरी झाली आहे. त्याचबरोबर चोराने त्याच्या घरातील ५० हजार रूपयांचीही चोरी केली आहे. सिकरचे पोलिस आता चोरी झालेल्या १४० कबुतरांचा शोध घेत आहेत.

आनंद नगर येथील एका घरात १४० कबुतरे होती. चोराने घराच्या छतावरून आत येऊन पिंजऱ्यात असलेली १४० कबुतरे चोर करून पळून गेला. जाता जाता चोर घरातील ५० हजारही सोबत घेऊन गेला. रात्री अचानक आवाज आल्याने सलीमने बाहेर येऊन बघितले. तर कबुतरांच्या पिंजऱ्याचे कुलुप तोडलेले होते. त्याचबरोबर घरात ठेवलेले ५० हजार रूपयेही गायब असल्याचे समोर आहे. मोहम्मद सलीम यांनी त्वरित पोलिसांना चोरीची माहिती दिली. पोलीस चोरी झालेल्या कबुतरांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

सलीम मोहम्मदकडे रंगीबेरंगी कबुतरे होती. त्याला आणि त्यांच्या नातवडांना कबुतरे पाळण्याची खूप हौस होती. ३१ डिसेंबरच्या रात्री घरातील सगळी माणसे जेवून आपल्या आपल्या खोलीत झोपायला गेली. रात्री जवळपास २ वाजताच्या सुमारास घराच्या छतावर आवाज आला. त्यावेळी मोहम्मद यांच्या नातवाने छपारावर जाऊन पाहिले तेव्हा तिथे कोणी नव्हते. कबुतरांच्या कपाटातील सगळे कबुतर नाहीसे झाले होते. मोहम्मद सलीम यांच्याकडे एकूण १४० कबुतरे होती.

मोहम्मद सलीम यांनी सांगितले की, त्यांचे दोन मजली घर आहे. गेल्या चार वर्षांपासून ते कबुरते पाळत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी पाच जोडी कबुतरे आणली होती. हळू हळू कबुतरे वाढत गेली. त्यामुळे त्यांच्यासाठी घराच्या छपरावर आम्ही पिंजरा तयार केला होता. पण चोरांनी रात्रीच्या वेळी शीडीच्या सहाय्याने छपरावर चढून पिंजऱ्यातील सगळे कबुतरं चोरी केली. सकाळी तुटलेली शिडी घराच्या मागच्या बाजूला मिळाली. त्याचप्रमाणे घरातील दोन कपाटे ही तुटलेली होती.

- Advertisement -

हेही वाचा – SBI मध्ये अधिकारी पदासाठी भरती सुरु; जाणून घ्या सर्व माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -