धक्कादायक! शिक्षकाने आठवीतील विद्यार्थीनीवर केले लैंगिक अत्याचार

शिक्षकाने आठवीतील विद्यार्थीनीवर केले लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

prayagraj student accuses teacher for sexual harassment police arrested him
अत्याचार

गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कदायक घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेतील शिक्षकाने आठवीतील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी धूमनगंज पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार केली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

असे आले प्रकरण उघडकीस?

प्रयागराज परिसरातील बमरौली परिसरात एका खासगी शाळेत मुलगी शिकत असून याच शाळेत शिकणाऱ्या शिक्षकाने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप विद्यार्थीनींने केला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनुसार, खासगी शिकवणी घेण्याच्या बहाण्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. आरोपी शिक्षक बृजेश हा मूळचा गाझीपूरचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो या शाळेत शिकवत असून तो पालकांसह विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार शाळेतच खासगी शिकवणी घेतो, असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्या आधारे शाळा व्यवस्थापनाने त्याला निलंबित केले आहे, असे शाळेच्या व्यवस्थापकांनी सांगितले आहे.


हेही वाचा – पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्टपासून सुरू