घरदेश-विदेश'पबजी'साठी मुलाने चोरले ५० हजार

‘पबजी’साठी मुलाने चोरले ५० हजार

Subscribe

'पबजी' खेळण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी एका १५ वर्षीय तरुणांने आपल्या वडिलांच्या खात्यातून ५० हजार चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

भारतात ‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड’ (पबजी) गेम तरूणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला असून मनोरंजन आणि मनाच्या समाधानासाठी खेळले जाणारे मोबाईल गेम्सचे आता दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. ‘पबजी‘ गेम खेळण्यासाठी एका तरुणांने ५० हजार रुपये चोरल्याची घटना पंजाबमधील जांधरमध्ये घडली आहे. आपल्या वडिलांच्या बँक अकाऊंटमधून पेटीएमच्या साहाय्याने चक्क ५० हजार रुपये चोरल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. हे पैसे त्यांने पबजीसाठी चोरल्याचे स्पष्ट केले आहे.

असे चोरले पैसे

जालंधरमध्ये एका १५ वर्षीय तरुणांने आपल्या वडिलांच्या बँकेतून पेटीएमच्या सहायाने पैसे चोरले. या तरुणाचे वडिल बाइकचे मॅकनिक असून त्यांना एकदा त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये कमी झाल्याचा कळले. मात्र त्यांना कोणताही ट्रान्झॅक्शनचा एसएमएस किंवा ओटीपी देखील आला नाही. त्यामुळे पैसे चोरीला कसे गेले असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलकडे हे प्रकरण सोपवल्यानंतर याचा उलगडा झाला. त्यांच्या मुलांने पेटीएममधून पैसे चोरल्याचे उघडकीस आले. हे पैसे त्या तरुणांने पबजीची अॅक्सिसरिज खरेदी करण्यासाठी चोरल्याचे त्यांनी कबुल केले आहे.

- Advertisement -

गुगल प्लेस्टोअर किंवा अॅप स्टोरमधून पबजीसाठी लागणारे साहित्य खरेदी करता येऊ शकते. या मुलानं त्याच्या मित्राच्या पेटीएम खात्यावरुन पबजीसाठीच्या साहित्याची खरेदी केली. या मुलांने त्यानंतर आपल्या वडिलांच्या मोबाईलमधला ओटीपी मेसेज डिलिट केला. वडिलांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. मात्र आपल्याच मुलांने पैसे चोरल्याचे कळताच त्यांनी पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे.


वाचा – सुरतमध्ये ‘पबजी’वर बंदी, खेळताना आढळ्यास होणार कारवाई

- Advertisement -

वाचा – धक्कादायक…’पबजी’च्या नादात प्यायला ‘हे’


पहा – जेव्हा मोदींना पबजी गेमवर महिलेने प्रश्न विचारला..पाहा काय झालं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -