घरदेश-विदेशकाँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष भेटणार? राहुल गांधी जबाबदारी सांभाळण्यास तयार - सूत्र

काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष भेटणार? राहुल गांधी जबाबदारी सांभाळण्यास तयार – सूत्र

Subscribe

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन अंतर्गत कलह सुरु असतानाच आता काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी काँग्रेसची बैठक पार पडली. पाच तास चाललेल्या बैठकीत अध्यक्ष पदावर चर्चा झाली. या बैठकीत राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार झाले आहेत. काँग्रेसच्या बैठकीला हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधींना पुन्हा एकदा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्याची चर्चा सुरू झाली. बैठकीत के सुरेश, अब्दुल खलिक, गौरव गोगोई आणि इतर काही खासदारांनी राहुल गांधी यांना पक्षाची सूत्र हाती घ्यावीत याबाबत आवाहन केलं. या खासदारांव्यतिरिक्त कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, आता राहुल गांधींनी पुन्हा कॉंग्रेसचे नेतृत्व करावं. सध्याच्या काळात पक्षाची कमांड केवळ राहुल गांधींना देण्यात यावी, यावर पक्षाचे सर्व मोठे नेते सहमत असल्याचं दिसून आलं. दुसरीकडे राहुल गांधी यांनीही पक्षाची जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दिला होता राजीनामा

गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा झालेला पराभव आणि अमेठीमध्ये स्वत:चा झालेला पराभव या सगळ्याची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी राजीनाम्याचं पत्र हाय कमांडला दिलं. यामध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत मिळालेल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे. आपल्या पक्षाच्या भविष्यासाठी उत्तरदायित्व आवश्यक आहे. यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं म्हटलं होतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -