घरदेश-विदेशअहंकारामुळे भाजपाचा पराभव झाला - राहुल गांधी

अहंकारामुळे भाजपाचा पराभव झाला – राहुल गांधी

Subscribe

आम्ही भाजपाला पराभूत करु मात्र कुणाला भारतातून मुक्त करण्याची, कुणाचे नामोनिशाण मिटवण्याची भाषा आम्ही करणार नाही, टोला राहुल यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपला लगावला.

गेल्या १५ वर्ष सत्ता असलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये विजय मिळवल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ही परिवर्तनाची खरी सुरुवात असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी तिन्ही राज्यातील मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.

- Advertisement -

२०१९ ला भाजपला हरवणार

या निवडणुकीत भाजपला आम्ही हरवलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही भाजपला हरवणार आहोत हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा अहंकारामुळे पराभव झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे. आम्ही भाजपाला पराभूत करु मात्र कुणाला भारतातून मुक्त करण्याची, कुणाचे नामोनिशाण मिटवण्याची भाषा आम्ही करणार नाही, टोला राहुल यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपला लगावला.

- Advertisement -

ही परिवर्तनाची सुरुवात

विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला विजय हा शेतकरी, व्यापारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. जनतेचा आवाज ऐकून कामे करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही जिंकलो आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुक जिंकणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -