घरदेश-विदेशराहुल गांधींचे जेटलींच्या पत्नीला सांत्वन पत्र

राहुल गांधींचे जेटलींच्या पत्नीला सांत्वन पत्र

Subscribe

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दिल्लीत निधन झाले. आज त्यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो, असे शोक व्यक्त करणारे पत्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लिहिले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या पत्नीला सांत्वन पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अरुण जेटली यांच्या निधनावर दुःख केले आहे. पत्रात त्यांनी लिहिले की, ”ज्येष्ठ भाजप नेत्याची संसदेतील उपस्थिती नेहमीच आठवणीत राहील.” शनिवारी दुपारी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आम्ही सदैव त्यांना आठवणीत ठेवू

राहुल गांधी यांनी जेटली यांच्या पत्नी संगीता जेटली यांना दुःख व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. या पत्रात राहुल गांधी यांना अरुण जेटली यांच्या निधनाने अतीव दुःख झाले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ”यापुढे अरुण जेटली यांचा आवाज संसदेत आम्हाला ऐकू येणार नाही. आम्ही सदैव त्यांना आठवणीत ठेवू.”

- Advertisement -

हेही वाचा – अरुण जेटली अनंतात विलीन

निवासस्थानाला भेट देऊन आदरांजली वाहिली

या काळात माजी केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियांना शांती आणि ताकद लाभो असे म्हणत राहुल गांधींनी पुढे लिहिले की, ”तुमचे कुटूंब हे माझ्या विचार आणि प्रार्थनेत आहे.” दरम्यान शनिवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या दक्षिण दिल्लीतील निवासस्थानाला भेट देत अरुण जेटली यांना आदरांजली वाहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -