घरदेश-विदेशखासगीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वे! देशात १०९ मार्गांवर धावणार १५१ खाजगी ट्रेन

खासगीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वे! देशात १०९ मार्गांवर धावणार १५१ खाजगी ट्रेन

Subscribe

बहुतांश आधुनिक ट्रेन्स ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात तयार केल्या जाणार

प्रथमच खासगी कंपन्यांना केंद्र सरकारकडून भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवासी ट्रेन चालविण्याचे आमंत्रण खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे. खासगी युनिट्सला आपल्या नेटवर्कवर प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी देण्याची योजना रेल्वेने बुधवारी औपचारिकरित्या सुरू केली. त्याअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने १०९ मार्गावर १५१ आधुनिक ट्रेनद्वारे प्रवासी गाड्या चालविण्यासाठी खासगी कंपन्यांकडे अर्ज मागविला आहे. रेल्वेने ही माहिती दिली की, खासगी क्षेत्रातून सुमारे ३०,००० कोटींची गुंतवणूक असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

गेल्या वर्षी आयआरसीटीसीने लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस ही पहिली खासगी ट्रेन सुरू केली. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कमी खर्चात देखभाल करणे, भारतीय रेल्वेमध्ये कमी कालावधीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ करणे, उत्तम सुरक्षा आणि जागतिक स्तरावरील प्रवासाचा अनुभव घेणे हे या मागील हेतू आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेच्या १०९ मार्गावर १५१ ट्रेन धावणार असून प्रत्येक ट्रेनमध्ये किमान १६ डबे असतील. या मार्गांवर धावणाऱ्या सर्व गाड्यांची ताशी वेग अधिकतम १६० किलोमीटर वेगाने असणार आहे. यापैकी बहुतांश आधुनिक ट्रेन्स ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात तयार केल्या जातील, असेही रेल्वेने म्हटले आहे.

रेल्वेची आर्थिक व्यवस्था, अधिग्रहण, ऑपरेशन आणि देखभाल याची जबाबदारी खासगी कंपन्याची असणार आहे. हा प्रकल्प खासगी कंपन्यांना ३५ वर्षांसाठी देणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. एका खासगी कंपनीला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे निश्चित शुल्क, वापरावरील उर्जा शुल्क आणि निश्चित महसूल यापैकी एक हिस्सा भारतीय रेल्वेला भरावा लागेल. तर या सर्व ट्रेन्समध्ये चालक आणि गार्ड हे भारतीय रेल्वेचे असतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.


बेस्ट सुसाट; मिळवला एका दिवसात ८३ लाखांहून अधिक महसूल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -