घरअर्थजगतरिलायन्स, एस्सेलमुळे येस बँकेचे बारा वाजले?

रिलायन्स, एस्सेलमुळे येस बँकेचे बारा वाजले?

Subscribe

येस बँकेच्या डिफॉल्टर्सच्या यादीमध्ये भाजपच्या देणगीदारांचा समावेश असून सर्वाधिक कर्ज हे अनिल अंबानींच्या रिलायन्सचं थकित आहे. आम आदमी पार्टीकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये या डिफॉर्टर्सची यादीच जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून येस बँक दिवाळखोरीत आल्यामुळे बँकेच्या खातेदारांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. कर्जाचा एनपीए वाढल्यामुळे येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले असून सध्या खातेदारांना त्यांच्या खात्यांमधून फक्त ५० हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. ही मर्यादा लवकरच हटवली जाणार असल्याचं जरी सांगितलं जात असलं, तरी येस बँक नक्की कशामुळे दिवाळखोरीत आली? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने येस बँकेच्या थकबाकीदारांची यादीच जाहीर केली असून त्यामध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्ससोबत एस्सेल, रेडियस, डीएचएफएल यांच्यासारख्या देशातील अग्रणी कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे या कंपन्यांमुळेच येस बँक दिवाळखोरीत गेल्याचं म्हटलं जात आहे.

देशातल्या बड्या कंपन्या डिफॉल्टर

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मोठ्या चौकशीनंतर अखेर अटक करण्यात आली आहे. त्यानंतर येस बँकेच्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली असून त्यातून या बाबी समोर येत आहेत. त्यामध्ये रिलायन्स, एस्सेल ग्रुपसारख्या बड्या कंपन्या येस बँकेच्या डिफॉल्टर्समध्ये असल्याचं निष्पन्न झालं आहे. आम आदमी पार्टीने जारी केलेल्या यादीनुसार यात सर्वात वर अनिल अंबानींच्या रिलायन्सचा क्रमांक लागतोय. रिलायन्सकडे येस बँकेचं १३ हजार कोटींचं कर्ज थकित आहे. त्याखालोखाल डीएचएफएलकडे ३ हजार ७५० कोटी, एस्सेल ग्रुपकडे ३३०० कोटी, रेडियस डेव्हलपर्सकडे १२०० कोटी तर आरकेव्ही डेव्हलपर्सकडे १२०० कोटींचं कर्ज थकित आहे.

- Advertisement -

येस बँकेचे डिफॉल्टर्स भाजपचे देणगीदार!

येस बँकेचं कर्ज थकवणारे डिफॉर्टर्स हे भाजपचे देणगीदार आहेत, असं आम आदमी पार्टीकडून करण्यात आलेल्या या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अजून एका दिवाळखोरीत गेलेल्या बँकेमध्ये भाजप कनेक्शन समोर आल्याचं बोललं जात आहे.


हेही वाचा – येस बँकेवर निर्बंध घालण्याआधीच गुजरातच्या कंपनीने काढले २६५ कोटी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -