घरदेश-विदेशSBI मध्ये २ हजार पदांची भरती..लवकर फॉर्म भरा

SBI मध्ये २ हजार पदांची भरती..लवकर फॉर्म भरा

Subscribe

बँकेत पीओची नोकरी हवी असेल, तर सरकारी बँकेत काम करण्यासाठी मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसच्या दोन हजार पदांवर अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार अर्ज करु शकतो.

बऱ्याच व्यक्तींना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक व्यक्तीची इच्छापूर्ण होते असे नाही. तसेच काही व्यक्तींना एका विशिष्ट पदासाठी बँकेत काम करण्याची संधी हवी असते. जर तुम्हाला बँकेत पीओची नोकरी हवी असेल, तर सरकारी बँकेत काम करण्यासाठी मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसच्या दोन हजार पदांची भरती काढली आहे. त्यानुसार इच्छुक आणि योग्य उमेदवार अर्ज करु शकतो. त्यासाठी फक्त ७ दिवस राहिले असून लवकर फॉर्म भरा.

या वेबसाइट्सवर तुम्ही अर्ज करु शकता

https://bank.sbi/careers

- Advertisement -

या आहेत महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज २२ एप्रिल २०१९ पर्यंत भरु शकता.

अर्जाचे पैसे आणि इंटिमेशन चार्ज भरण्याची तारीख २२ एप्रिल २०१९ पर्यंत
एन्टरन्ससाठी अॅडमिट कार्ड कधी? – जुलै २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यात
एन्टरन्स परीक्षा कधी? – ८, ९, १५ आणि १६ जून २०१९
एन्टरन्सचा निकाल – जुलै २०१९ च्या पहिल्या आठवड्यात
मुख्य परीक्षेसाठी कॉल लेटर – जुलै २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यात
मुख्य परीक्षा – २० जुलै २०१९
ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात मुख्य परीक्षेचा निकाल
इंटरव्ह्यूसाठी कॉल लेटर सप्टेंबर २०१९ पर्यंत डाऊनलोड करा
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम मेरिट लिस्ट

- Advertisement -

पदांची संख्या

एस सी (SC) – ३००
एसटी (ST) – १५०
ओबीसी (OBC) – ५४०
ईडब्यूएस (EWS) – २००
खुलावर्ग (GEN) – ८१०
पदांची एकूण संख्या – २ हजार

अर्ज शुल्क

1. SC/ ST/ PWD: १२५/- (इंटिमेशन चार्ज)
2. सामान्‍य वर्ग/ EWS/ OBC: ७५०/- (अर्ज शुल्‍क आणि इंटिमेशन चार्ज) याचा रिफंड मिळणार नाही

शैक्षणिक योग्यता

कुठल्याही विद्यापीठाची पदवी किंवा तत्सम. उमेदवार पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला असेल तरी अर्ज करता येईल.

वयाची अट

कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ३० वर्ष. उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९८९ च्या आधी नको.

पगार

ज्युनियर मॅनेजमेंट ग्रँड स्केल १ उमेदवाराला सुरुवातीला २७ हजार ६२० रुपये पगार मिळेल. सोबत ४ अॅडव्हान्स इन्क्रिमेंट मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -