घरदेश-विदेशतामिळनाडूच्या मंदिरात चेंगराचेंगरी; ७ भाविक ठार १० जण जखमी

तामिळनाडूच्या मंदिरात चेंगराचेंगरी; ७ भाविक ठार १० जण जखमी

Subscribe

पुजार्‍याकडून नाण्याचे वाटप केले जात असताना ते मिळविण्यासाठी शेकडो भाविकांनी गोंधळ सुरू केला. यामुळे चेंगराचेंगरी झाल्याने ७ भाविकांना प्राण गमवावे लागला

तामिळनाडूच्या त्रिची येथील कृपास्वामी मंदिरात रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाल्याने ७ भाविकांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले. मुत्तायमपलायम्‌ गावातील रूप्पास्वामी मंदिरात ही घटना घडली. त्यांना तुरायूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चैत्र पौर्णिमेनिमित्त पूजा करण्यासाठी रविवारी या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील ‘पाडी कासू’ परंपरेनुसार मंदिराच्या पुजार्‍याकडून मंदिरातील दानपेटीतून भक्तांना रुपयाचे नाणे दिले जाते. हे नाणे घरी नेल्यानंतर भरभराट होते, घरामध्ये संपन्नता येते अशी तेथील लोकांची भावना आहे. यामुळे गावातीलच नाहीत तर आजुबाजुच्या जिल्ह्यांमधीलही हजारो लोक हे रुपयाचे नाणे मिळविण्यासाठी येतात. हे नाणे मिळाल्यास ते घरातील तिजोरीमध्ये ठेवले जाते, असे मानले जाते.

- Advertisement -

या नाण्याचे चैत्र पौर्णिमेनिमित्त पुजार्‍याकडून वाटप केले जात असताना ते मिळविण्यासाठी शेकडो भाविकांनी एकच गोंधळ सुरू केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याने ७ भाविकांना प्राण गमवावे लागले. पूजा सुरु असताना गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नव्हते. त्यामुळे गर्दीच्या प्रमाणात तेवढे पोलिसही मंदिरात उपस्थित नसल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -