गायक मीका सिंगला दुबईत अटक

गायक मिका सिंगला दुबईत अटक करण्यात आली आहे. ब्राझीलच्या एका १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai
singer mika singh
मिका सिंगला अटक

गायक मिका सिंगला दुबईत अटक करण्यात आली आहे. बुधवार, ५ डिसेंबरच्या मध्यरात्री ३ वाजता मुर्रक्काबत पोलिसांनी मिकाला ताब्यात घेतले आहे. बुर दुबईतील एका बारमधून पोलिसांनी अटक केली असून ब्राझीलच्या एका १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या मुलीने अश्लील फोटो पाठवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मिकाला अबू धाबीच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

नेहमीच वादात राहणारा मिका 

२०१५ साली नवी दिल्लीत डॉक्टरशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मिकावर कारवाई झाली तर २००६ साली भरपार्टीत आयटम गर्ल राखी सावंतचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर २०१४ साली हिट अँड रनप्रकरणी देखील मिका वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. असा हा वादग्रस्त गायक आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील वादात अडकला आहे. दरम्यान, मिका सिंग एका शोसाठी गेल्या काही दिवसांपासून दुबईत असून त्याच्या सुटकेसाठी मित्रमंडळींकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

 

View this post on Instagram

 

It was so lovely to meet @akon after so long.. as always ..he rocked the crowd with his super hit tracks…

A post shared by Mika Singh (@mikasingh) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here