घरदेश-विदेशआता भारताची स्पेशल सर्जिकल स्ट्राइक टीम

आता भारताची स्पेशल सर्जिकल स्ट्राइक टीम

Subscribe

दहशतवाद्यांचा वाढता धोका लक्षात घेऊन भारताने सर्जिकल स्पेशल फोर्स, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे कमांडो एकत्र येऊन स्पेशल ऑपरेशन विभाग तयार करण्यात आला आहे.

जम्मूकाश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहेत. लष्कर आणि दहशतवाद्यांध्ये सतत चकमक सुरुच असते. हा दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेता भविष्यात सर्जिकल स्ट्राइक सारख्या कारवाया वारंवार कराव्या लागू शकतात. हीच बाब ध्यानात घेऊन सर्जिकल स्ट्राइक सारखे ऑपरेशन्स आणि गुप्त मोहिमा पार पाडण्यासाठी एका नव्या विभागाची स्तापना करण्याचे काम सुरु आहे. इंडिया टुडेच्या सूत्रानुसार या स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कमांडोंचा समावेश असणार आहे.

या विभागाची जबाबदारी

देशांतर्गत आणि देशाबाहेरील संवेदनशील मोहिमांची गुप्तपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या विभागावर असणार आहे. तर कमांडोंचे हे विशेष पथक सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी तळांना त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरना लक्ष्य करणार आहे. लष्कराचे पॅरा कमांडो, नौदलाचे मार्कोस आणि हवाई दलाचे गरुड कमांडो या विशेष पथकाचा भाग असतील. सुरुवातीला या स्पेशल फोर्सेसमध्ये दीडशे ते दोनशे कमांडो असतील. नंतर त्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन हजार कमांडोंची सुसज्ज फोर्स उभारण्याची योजना असून अन्य दोन सैन्य दलांपेक्षा लष्करातील कमांडोंची संख्या जास्त असणार आहे.

- Advertisement -

स्पेशल फोर्सेसमधील मेजर जनरल रँकचा अधिकारी प्रमुख असणार

लष्कराच्या स्पेशल फोर्सेसमधील मेजर जनरल रँकचा अधिकारी नव्या विभागाचा प्रमुख असणार आहे. तसेच लवकरच या स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनचे काम सुरु होईल. स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनमध्ये सध्या नियुक्तीचे काम सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. तर स्पेशल फोर्सेसमध्ये असणारे तिन्ही सैन्य दलाचे कमांडो स्वतंत्रपणे काम करणार आहेत.


वाचा – दहशतवादी नेपाळमार्गे भारतात करतात घुसखोरी

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -