अरे देवा! फेसबुकवर वृद्ध पसरवतात सर्वाधिक Fake News

फेसबुकच्या माध्यमातून फेक न्यूज (खोट्या बातम्या) पसरवणाऱ्यांमध्ये  ६५ वर्षावरील वृद्ध व्यक्तींची संख्या अधिक आहे. तरूणांच्या तुलनेतही ही संख्या जास्त आहे. 

Mumbai

फेसबुक हे जगभरातील करोडो लोकांच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. सोशल मीडियाचं हे प्रभावी माध्यम आजच्या काळात माणसाला माणसाशी जोडतं. आपल्या जुन्या मित्रांशी, नातलगांशी संपर्कात राहण्यासाठी आणि नवीन मित्र जोडण्यासाठी लोक सर्रास फेसबुकचा वापर करतात. इतकंच जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडलेली छोट्यात छोटी घटना तसंच एखादा मोठा इव्हेंटही फेसबुकच्या माध्यमातून हमखास व्हायरल होतो. मात्र, याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘फेक न्यूज’ पसरवण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे. याच विषयाशी संबंधित एक आश्चर्यजनक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार, फेसबुकच्या माध्यमातून फेक न्यूज (खोट्या बातम्या) पसरवणाऱ्यांमध्ये  ६५ वर्षावरील वृद्ध व्यक्तींची संख्या अधिक आहे. तरूणांच्या तुलनेतही ही संख्या जास्त आहे. न्यूयॉर्क विद्यापीठ आणि प्रिंसटन विद्यापीठाने केलेल्या एका सर्व्हेद्वारे ही अंचबित करणारा माहिती उघड झाली आहे.

अमेरिकेमध्ये २०१६ साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची लगबग सुरू होती. या काळात फेसबुकवर फेक न्यूजचं अक्षरश: पीक आलं होतं. या काळात प्रचंड प्रमाणात खोट्या बातम्या फेसबुकवरुन पसरवल्या जात होत्या. त्यावेळी करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये ६५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाचे लोक खोट्या बातम्या फेसबुकवर शेअर करण्यात पटाईत असल्याचं उघडकीस आलं आहे. १८ ते २९ या वयोगटातील तरुणांच्या तुलनेत ६५ वर्षावरील अधिक वृद्धांनी फेक न्यूज व्हायरल केल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं. मात्र, वृध्द लोकांनी पसरवलेल्या या खोट्या बातम्यांना फेसबुकवर फारसा प्रतिसाद न मिळाल्याचंही या रिपोर्टमधून समोर आलं आहे. दरम्यान, प्रिंसटन विद्यापीठातील सहायक प्राध्यापक अँड्र्यू गेस यांनी सांगितल्यानुसार  वृद्ध व्यक्तीकडून पसरवण्यात येत असलेल्या अशा फेक न्यूज ओळखण्यासाठी नवीन उपाय लवकरात लवकर शोधले जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here