घरदेश-विदेशपिशवीमध्ये अर्भक ठेऊन 'ति'ने गाठलं पोलीस स्टेशन!

पिशवीमध्ये अर्भक ठेऊन ‘ति’ने गाठलं पोलीस स्टेशन!

Subscribe

हातातील पिशवीमध्ये ५ महिन्यांचे अर्भक घेऊन अल्पवयीन बलात्कार पीडितेने पोलीस ठाण्यात प्रवेश केला. मध्यप्रदेशातील सटाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या प्रकारने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २२ वर्षीय नराधम मनोज फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलीस ठाण्यात रोजजीच धावपळ सुरू होती. तक्रार दाखल करून घे, आरोपींकडून गुन्हा वदवून घेण्यामध्ये पोलीस गुंग होते. अशात एका अल्पवयीन बलात्कार पीडितेने पोलीस ठाण्यात प्रवेश केला. त्यावेळी तिच्या हातातील पिशवीमध्ये होते ५ महिन्याचे अर्भक! पीडितेच्या या कृतीने पोलीस देखील हादरून गेले. हातची कामे टाकून प्रत्येक जण पाहत होता तो तिच्या हातातील पिशवीकडे! सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या तिच्या हातातील पिशवीकडे! प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता का उचलले असेल तिने असे पाऊल? काय असेल हीची कर्मकहाणी? कोण आहे तो नराधम? ५ महिन्यांपासून ती गप्प का बसून होती? पण सारा प्रकार ऐकल्यानंतर पोलीसांच्या पायाखालची जमिन सरकली. वेगाने सुत्रे हालली. पण, नराधम मात्र फरार झाला असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. मध्यप्रदेशातील सटाणा जिल्ह्यातील घटनेने आता राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण

सहा महिन्यापूर्वी ती जंगलामध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. त्याच वेळी नराधमाने डाव साधला आणि तिच्या अब्रुवर घाला घातला. यावर तो नराधम थांबवा नाही. घरी कुणाला सांगितलीस तर जीवाला मुकशील अशी धमकी देखील दिली. अशातच महिना गेला.अल्पवयीन बलात्कार पीडितेला दिवस गेले आणि ती गरोदर राहिली. घरच्यांना हा सारा प्रकार समजला आणि त्यांच्यावर आभाळ कोसळले. अशातच दिवसांमागून दिवस जात होते. काय करावे हे कुणालाही सुचत नव्हते. बलात्कार पीडितेला दिवस गेल्याची माहिती २० वर्षीय नराधम मनोजला कळाली. नराधम मनोज १३ जुलै रोजी बलात्कार पीडितेच्या घरी आला आणि गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करू लागला. त्यानंतर जबरदस्तीने औषध – गोळ्या देऊन पीडितेचा गर्भपात करण्यात आला. अखेर या प्रकाराने हादरलेल्या पीडितेने पिशवीमध्ये अर्भक घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून २० वर्षीय नराधम मनोज फरार झाला आहे. दरम्यान, पीडितेने आणलेले अर्भक आता वैद्यकीय चाचणीकरता पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सटाणा जिल्ह्यातील या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी देखील एप्रिल महिन्यामध्ये २० वर्षिय मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी नीरज पांडे, धीरज पांडे, प्रेम कुमार आणि राज कुमारसह नर्स सपनाला देखील बेड्या ठोकल्या होत्या. बलात्कारानंतर दिवस गेले. त्यावेळी सपनाने बलात्कार पीडितेचा जबरदस्तीने गर्भपात केला होता. बलात्कार झाल्याचे कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी पीडितेला देण्यात आली होती. पीडितेला दिवस गेल्यानंतर हा सारा प्रकार समोर आला होता. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वाचा – भोंदू बाबाने केला १२० महिलांवर बलात्कार!

वाचा – चार दिवसात चाळीस जणांनी तरुणीवर केला बलात्कार

वाचा – ड्रग्ज देऊन रशियन महिलेवर सामूहिक बलात्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -