तेलंगणामध्ये टीआरएच्या नेत्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

नारायण रेड्डी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे समर्थक आक्रमक झाले. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण केली. यामध्ये हे दोन्ही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले.

Telangana
TRS Leader Narayana Reddy murder case
टीआरएस नेते नारायण रेड्डी यांची निर्घृण हत्या

तेलंगणामध्ये राजकीय वादातुन तेलंगणा राष्ट्र समतीचे (टीआरए) नेते नारायण रेड्डी यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. विकराबाद जिल्ह्यातील सुल्तानपूर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या केली आहे. मंगळवारी सकाळई नारायण रेड्डी यांचा मृतदेह सापडला. नारायण रेड्डी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे समर्थक आक्रमक झाले. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण केली. यामध्ये हे दोन्ही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नारायण रेड्डी यांचा ग्रुप आणि प्रतिस्पर्धी समूहामध्ये वाद झाला होता. या वादानंतर तेलंगणा राष्ट्र समतीचे नेता नारायण रेड्डी यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सुल्तानपूर गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेच्या गांभिर्याला लक्षात घेता घटनास्थळावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here