घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी लहान मुलांचा वापर

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी लहान मुलांचा वापर

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे. काश्मीरमध्ये एका ९ वर्षीय मुलाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे विटंबन केलेले फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल केले जात आहे. सुरक्षा यंत्रणांविरोेधातही चुकीची माहिती पसरवली जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत असतानाच ही परिस्थिती आणखी चिघळण्यासाठी अतिरेक्यांनी नविन मार्गाने प्रयत्न सुरु केला आहे. दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्याची एकही संधी सोडत नाही. सुरक्षा दल आणि रहिवाशी यांच्यातील वाद विकोपाला जावा म्हणून काश्मीरमध्ये अतिरेकी संघटना किळसवाण्या प्रवृत्तींचा अवलंब करत आहे. हे अतिरेकी इतक्या वाईट थरावर जावून पोहचले आहेत की, सुरक्षा दल आणि लोकांमध्ये वाद व्हावा म्हणून त्यांनी ९ वर्षीय मुलाची अमानुषपणे हत्या करुन त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

काय आहे प्रकरण?

गुरुवारी काश्मीरच्या गुशी भागात एका ९ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला. या मृतदेहाची अत्यंत वाईट प्रकारे विटंबना करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासणीत या मुलाची ओळख पटली. हा मुलगा काश्मीरच्या कुलगाम गावातील असून त्याचे नाव अमर फारुख मलिक असे होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमर हा कुलगामच्या एका शाळेतील तिसरीचा विद्यार्थी आहे. १६ जुलैला संध्याकाळी ४ वाजता अमर घरातून बाहेर पडलेला. त्यानंतर त्याचा काही पत्ताच लागला नसल्याने अमरचे वडील फारुख अहमद मलिक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, तरीही अमरचा पत्ता लागला नाही.

- Advertisement -

नाल्यामध्ये आढळला मुलाचा मृतदेह

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी गुशी भागाच्या नाल्यामध्ये एका मुलाचा मृतदेह आढळला. त्यानंतर वाऱ्यासारखी ही बातमी संपूर्ण भागात पसरली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरु केली. त्यांच्या या तपासात हा मृतदेह कुलगामच्या अमरचाच आहे, हे सिद्ध झाले. आतापर्यंत पोलीस तपासात अमरच्या हत्येमागे अतिरेकी संघटना आहेत की, गावातील कुणी स्थानिक नागरिक याची माहिती मिळालेली नाही. गुन्हेगारांपर्यत पोहोचण्यासाठी काश्मीर पोलिसांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली आहे.

- Advertisement -

लोकांच्या रागाचा फायदा घेत आहेत अतिरेकी

चार दिवस निघून गेले तरी मुलाचा पत्ता पोलीस लावू शकले नव्हते. जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा स्थानिकांची तळपायाची आग मस्तकात शिरली. नागरिकांचा याच संतापाचा उपयोग करुन काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना करत आहे. या घटनेनंतर दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर त्या मुलाच्या मृतदेहाचे छायाचित्र टाकले,सोबतच सुरक्षा दलावर टीका करण्यात आल्या होत्या. नागरिकांना भडकवण्यासाठी अतिरेकी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -